shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एमआयएम पक्ष प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध..!



हल्लेखोरांवर कारवाई तथा ओवैसी सुरक्षेविषयी एम.आय. एम.आणि इतर पक्ष संघटनांचे शासनास निवेदन..!

श्रीरामपूर (शौकतभाई शेख):- 
देशात सर्वाधिक मोठी आणि महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीमुळे राजकिय अखाड्यात प्रचंड असा मोठा धुमाकूळ चालु असताना एम.आय.एम.पक्षाने या निवडणुकीत एन्ट्री करताच अनेक प्रस्थापितांचे अक्षरश: दाबे दणाणले गेले आहे,एम.आय.एम पक्षाचा उत्तर प्रदेशमध्ये वाढता प्रभाव हा अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे,एम.आय.एम.हा केवळ एक पक्षच नसुन प्रत्येक्षात मोठी आंधीच (तुफान) आहे.


या आंधीच्या आगमनाने अक्षरशः अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, याकरीता ते ऐनकेन प्रकारे या आंधीस रोखू पाहण्यासाठी अनेक प्रकारचे मनसुबे आणि षडयंत्र रचत वेळप्रसंगी भ्याड हल्ले देखील करत एम.आय.एम.नावाच्या आंधीला रोखु आणि थोपवू पहात आहे,याचाच एक भाग म्हणून दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ रोजी ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादूल मुस्लिमीन (एम.आय.एम.)पार्टीचे सर्वेसर्वा खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या जीवघेण्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदवून त्यांना झेड सिक्युरिटी सुरक्षा प्रदान करण्यात येऊन दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे एम. आय. एम.आणि इतर ओबीसी,बहूजन पक्ष संघटनांच्यावतीने श्रीरामपूर तहसिलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन  देण्यात आले.



या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर उत्तर प्रदेश मधील त्रंजारसी टोल नाक्यावर काही जातीयवादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांकडून त्यांच्या वाहनांवर गोळीबार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला परंतु सुदैवाने ते यातून बालंबाल बचाचले,यात त्यांच्या वाहनावर चार राऊंड फायर करण्यात आले तथा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, यापूर्वीही दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी विघातक हल्ला करण्यात आला होता,असे वारंवारच्या हल्ल्यामुळे देशातील सी.बी.आय. व इंटेलिजन्स अकार्यक्षम झाल्याचा संदेश सर्वदूर समाजात पसरत आहे.तसेच ज्या व्यक्तीला उत्तम संसदपटू म्हणून पुरस्कारीत केले व एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्यासोबत अशी घटना घडणे ही बाब अत्यंत संशयकारक आणि निंदनीय तथा दुर्दैवी अशीच आहे.सदरील या घटनेचा आम्ही एम.आय.एम.पक्ष आणि ओबीसी,बहुजन पक्ष, संघटना तिव्र शब्दात निषेध नोंदवत असून खासदार असदुद्दीन ओवैसी यांना गृहमंत्र्यांलय भारत सरकार तर्फे त्वरित झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी,सोबतच या हल्ल्यामागील दोषींना त्वरित अटक करण्यात येऊन त्यांना कठोर शासन करण्यात यावे तसेच उत्तर प्रदेश राज्यात आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडाव्यात,कायदा व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने उत्तर प्रदेश राज्यात केंद्रीय सुरक्षा बल पाठवण्यात यावे.कायदा व सुव्यवस्था कायम  करण्यात यावी म्हणून आज रोजी लोकशाही मार्गाने लढा देऊन आम्ही मा.प्रांताधिकारी/तहसिलदार यांचे मार्फत शासनास निवेदन देऊन मागणी करत सदरील घटनेचा जाहीर निषेध नोंदवत असल्याचेही या निवेदनात शेवटी म्हटले आहे.


या निवेदनावर ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादूल मुस्लिमीन (एम.आय.एम.),चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष आदीलभाई मखदूमी,ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष हाजी फय्याजभाई बागवान,जिल्हा सरचिटणीस इब्राहीम बागवान, जिल्हा संघटक जाकीरभाई शाह,जिल्हा उत्तर सचिव शाहिद खान,एम.आय.एम.श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मुनवर शेख, भैयाभाई वडाळावाले,अमीन पटेल, राहुरी तालुका अध्यक्ष रेहान इनामदार, अन्वर सय्यद, दानिश इदरीश शेख, रिजवान शेख, मोहसिन शाह ,मोबिन शाह, इमरान ईरानी, अरबाज पठाण, नानासाहेब शिंदे, अशफाक शेख, इस्माईल शेख नेवासा तालुका अध्यक्ष,अब्दुलभाई तांबोळी, नवाबभाई शेख,अकरम पठाण, सायन अजीम,नूर पठाण,नासिर शेख.बहुजन समाज पार्टी तालुका अध्यक्ष जाकिरभाई  शाह,राष्ट्रीय किसान मोर्चा प्रभारी अहमदनगर जिल्हा (प्रोटान) धनवटे  सर, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जिल्हा उत्तर अध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, मुक्तार महेमुद पठाण, रियाज अंसारी,भारत मुक्ति मोर्चा डॉ. हमीद,बहुजन मुक्ति पार्टी, दिलीपराव बडदे, इत्यादी उपस्थित होते.
close