shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्जत तालुका पोलिस स्टेशनची मनमानी..? गरिबांना, महिलांना येथे मिळत नाही न्याय..!!

कर्जत:- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पोलीस स्टेशन ला गरिबांना न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. यावेळी एका पिडीतेने व्यक्त केलेली घटना थक्क करणारी आहे.
तिने व्यक्त केले की,दिनांक 21/2/2022 रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मी विशाखा दांडे व माझे वडील हरिश्चंद्र दांडे व माझे चुलते गोरख धांडे राहणार- दुर्गाव हे माझ्या राहत्या घरी खेड तालुका कर्जत येथे आले व मला मारहाण करू लागले. या मारहाणी मध्ये मला रक्त निघालेले पाहून माझी सहा महिन्यांची गरोदर वहिनी प्रियंका समीर धांडे ही मला वाचवण्यासाठी मध्ये पडली तेव्हा तिलादेखील गोरख धांडे, हरिश्चंद्र धांडे यांनी काहिही मुलाहिजा न बाळगता जोरात ढकलून दिले. त्या मारहाणीत माझी वहिनी गरोदर असल्यामुळे पोटावर पडल्याने बेशुद्ध पडल्या. तेव्हा मी जोरात ओरडले यामुळे गोरख धांडे व हरिश्चंद्र धांडे यांनी येथून लवकरच पळ काढला. 


काही वेळात माझी आई जयश्री धांडे घरी आली तिला आम्ही घडलेली घटना सविस्तर सांगितली. तिने लगेचच कर्जत पोलिस स्टेशनचे पो.नि. चंद्रशेखर यादव यांना फोन करून घडलेली घटना सविस्तर सांगितली. परंतु त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्यानतर आम्ही कंट्रोल रूमला फोन करून आमची तक्रार घेण्यासाठी पोलिसांना घरीच पाठवा असे विनंती करून सांगितले. एका तासानंतर पोलिस घरी आले. केवळ एम. एल.सी ची चिठ्ठी देऊन गेले. दुस-या दिवशी आम्ही मेडिकल करण्यासाठी कर्जत येथील शासकीय रुग्णालयात दाखल झालो. तिथे सांगितले की वहिनीच्या पोटातील बाळाचे ठोके कमी पडतात असे सांगण्यात आले.

         पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगीतले. दि.24/2/2022 रोजी कर्जत पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास गेलो असता केवळ एन.सी.आर घेण्यात आली. त्यानंतर आम्ही एफ आय आर का नाही घेतली असे विचारल्यानंतर तुम्ही पोलिस निरीक्षक साहेबांना भेटा असे सांगण्यात आले. त्यानंतर बराच वेळ थांबल्यानंतर व वाट पाहिल्यानंतर व एडिशनल एसपी साहेबांना फोन केल्यानंतर पो. नि. यांनी आम्हाला बोलावले परंतु आमची एफ आय आर न घेता मी व्हेरिफिकेशन करूनच तक्रार दाखल करून घेईल असे सांगण्यात आले. समोरच्या व्यक्तींना पोलीस स्टेशनला बोलावून घेण्यासाठी कर्जत येथील कॉन्स्टेबल काळे यांना फोन करून सांगण्यात आले. अर्ध्यातासातच कॉन्स्टेबल काळे गोरख धांडे यांना घेऊन पोलीस स्टेशनला आले. त्यानंतर आम्हाला समोर उभे करून गोरख धांडेला डोक्याला खुप लागले आहे, असे पोलिस निरीक्षक आम्हांला म्हणाले. त्यानंतर पो.नि.यांना आम्ही गोरख धांडेने यापूर्वीच्या केसमध्ये कॉस्न्टेबल काळे यांना ७०,००० रूपये दिले आहेत असे रेकॉर्डिंग ऐकवले. ते ऐकले की लगेचच पी.आय. यांनी आम्हांला तक्रार द्या असे सांगितले. पण गोरख धांडे याला आमच्या समोर सांगितले की, तू पण यांच्यावर अजून एक तक्रार दाखल कर. व जास्त कलम लावा. कोणाची नावे घ्यायची ती नावे घे. बाकी कोर्ट पाहून घेईल. मी आहे तुमच्या सोबत असे पी.आय व काळे गोरख धांडे म्हणाले. आम्ही पी.आय यांना विचारले असता ते म्हणाले ते कितीही केस करू शकतात. व माझ्या मावशीला ,(माधूरी चव्हाण)तु एक बाई आहे जास्त बोलू नको. तुझा काय संबंध केसशी. असे अरेरावीची,धमकीची भाषा बोलू लागले. 

आमच्यावर अन्याय होऊन उलट पी.आय. त्यांच्या बाजूने होऊन सदर प्रकरण व केस दाबली आहे. 
अनेकवेळा यापूर्वी आम्ही कर्जत पोलिस ठाण्यात जात होतो.आम्हांला मदत हवी होती. तरीदेखील वरिष्ठ अधिकारी यांनी सदर प्रकरणाची कधी ही दखल घेतली नाही. तरी आम्हांला न्याय हवा आहे.असे विशाखा हिने शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केले. 

अशा घटना सर्रास घडत आहेत.तरी पोलिस बांधवांनी न्याय देण्याचा प्रयत्न करावा नाहक त्रास देऊ नये अशी विनंती ही विशाखा हिने व्यक्त केले आहे.
close