नगर । प्रतिनिधी :-
सविस्तर माहिती अशी की,,नगर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून नवीन शिधापत्रिका देण्यासाठी तब्बल एक ते दोन महिन्यापासून सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक केली जात आहे..तिकडे पंतप्रधान आवास योजना गरीब कुटुंबांना घरकुल योजना राबवत आहे. त्यासाठी रेशन कार्ड अत्यावश्यक असल्याने योजनेचा लाभ मिळत नाही.आणि एकीकडे मात्र पुरवठा विभाग दोन-तीन महिन्यापासून लाभार्थ्यांना रेशन कार्ड उपलब्ध करुन देईना.पुरवठा विभागाकडे नविन शिधापत्रिकेची मागणी केली असता,वरीष्ठ कार्यालयाकडे नवीन कोऱ्या शिधापत्रिकेची मागणी केली आहे, परंतु अजुन आमच्याकडे उपलब्ध झाले नाही. अशी उडवाउडवीचे उत्तर देऊन जनतेची पिळवणूक करीत आहे.परंतु त्यांच्या कामकाजामुळे अनेक लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहत आहेत.
यामुळे नागरिकांचे शैक्षणिक, वैद्यकीय, शासकीय कल्याणकारी योजना, आदी विभागातील लाभाचे नुकसान होत आहे.
"सरकारी काम आणि बारा महिने थांब" अशीच भीती नागरिकांच्या मनात संबंधित खात्याने करून ठेवली आहे..!
तरी वंचित रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काचे रेशनकार्ड कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत तालुक्यातील अनेक लाभार्थी आहेत.... तरी संबंधित विभाग याची दखल घेईल का, व योग्य ती कारवाई करील का...? हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे आहे....!

