shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवजयंतीनिमित्त शिर्डीत युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजित



शिर्डी । प्रतिनिधी(संजय महाजन) :-
       छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात नागरीकांचा प्रतिसाद मिळाला. शिबिरात ७० युवा रक्तदात्यांनी रक्तदान करून आदर्श पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने परीसर दुमदुमला होता. सर्वत्र भगवेमय चित्र पहायला मिळाले.

       शुक्रवारी (दि. १८) शिर्डी शहरात युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवजयंती सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरवात करण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्री शिवजन्मोत्सवा नंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सर्वत्र आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची रोषणाई बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणी दिव्याच्या लखलखीत प्रकाशाने अवकाश उजळून निघाले होते. 

         शनिवारी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची शिर्डी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नितीन उत्तमराव कोते, रमेश गोंदकर, ताराचंद कोते, निलेश कोते यांच्या हस्ते विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. याप्रसंगी सचिन तांबे, सुजित गोंदकर, मंगेश त्रिभूवन, हरिश्चंद्र कोते, रवींद्र गोंदकर, तानाजी गोंदकर, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दातरे, प्रमोद गोंदकर, सुनील गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, विजय कोते उपस्थित होते.

        रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे यंदर्दा देखील ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्वप्रथम शिर्डी ग्रामस्थ प्रमोद गोंदकर, माजी नगरसेवक सुजित गोंदकर यांनी रक्तदान करून युवकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीनंतर शहरातून अभूतपूर्व भव्य रॅली काढण्यात आली होती. सायंकाळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज यांची शहरातून वाजतगाजत फटाक्यांची आतीषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या प्रांगणात हा भव्यदिव्य सोहळा साजरा होताना छत्रपतींच्या युगाची आठवण करून देणारा ठरला.
close