shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर येथील ताहीर मुल्ला या लहान मुलांची काल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट घेऊन केली तब्बेतीची विचारपूस

वालचंदनगर येथील ताहीर मुल्ला या लहान मुलांची काल राज्यमंत्री दत्तात्रय  भरणे यांनी भेट घेऊन केली तब्बेतीची विचारपूस
इंदापूर प्रतिनिधी: मागील काही दिवसांपूर्वी ताहीर मुल्ला याच्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांकडून बाळाच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचे समजले. त्या मुळे बाळाच्या हातावरती उपचार करणे शक्य नव्हते. घाबरलेल्या मुल्ला कुटुंबीयांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन घटनाक्रम सांगितला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्वरित डॉक्टरांशी संवाद साधून त्या लहान बालकाला ससून रुग्णालयात दाखल करायला सांगितले. ससून रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून त्या बाळाच्या हृदयावरती शस्त्रक्रिया केली. ती शत्रक्रिया यशस्वी पार पडली. 
यानंतर २८ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्यमंत्री दत्तात्रय  भरणे यांचे चिरंजीव श्रीराज  भरणे यांनी ससून रुग्णालयात जाऊन बाळाच्या तब्बेतीची चौकशी केली होती. व डॉक्टरांशी संवाद साधला होता. हृदयावरील शस्त्रक्रिया नंतर तहीर मुल्ला या लहान बाळाच्या हातावर उपचार करण्यात आले. 

राज्यमंत्री दत्तात्रय  भरणे यांच्या मदतीमुळे मुल्ला कुटुंबियांचे जवळपास २ लाख रुपायांचा खर्च माफ झाला. आणि या नंतर स्वतः राज्यमंत्री दत्तात्रय  भरणे यांनी मुल्ला कुटुंबियांची भेट घेतल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
close