shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुलामाची मानसिकता सोडून द्या...!


क्लार्क पासून कलेक्टर कमिशनर पर्यंत कुणीही असो, सरकारी अधिकारी आपले मालक नसतात. त्यांना साहेब म्हणणं आणि त्यांच्यासमोर खांदे पाडून, झुकून उभं रहाणं बंद करा. तुम्ही त्यांचे मालक आहे ते तुमचे नोकर आहेत. त्यांना आदर देणं हा त्यांच्या पदाचा आदर असतो आणि आपल्या संस्कृतीचा भाग असतो.
  
सरकारी अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना अर्ज करताना शेवटी कार्यवाही करण्यासाठी विनंती करू नका. फक्त आपले म्हणणे मांडा आणि शेवटी 'तरी या अर्जावर लवकरात लवकर कार्यवाही करावी' अशा प्रकारचे शब्दप्रयोग वापरा. त्यांना लिहायच्या पत्रामध्ये महोदय आणि पदाच्या सुरुवातीला मा. असे शब्द वापरा, ते पुरेसे आहे. पदाला किंमत देणे फक्त महत्वाचे आहे.

जनता दरबार भरवायला राजकारणी आपले राजे नसतात. 'जनता दरबार' या शब्दाला कडक विरोध करा. इथे राजा कुणीच नाहीये. नागरिक या लोकशाहीचे मालक आहेत, नेते आपले फक्त प्रतिनिधी आहेत आणि सरकारी अधिकारी नोकर आहेत. राजकारणी लोक राजकारण करून जनतेवर उपकार करत नसतात, त्यांना ते क्षेत्र आवडत असतं म्हणून ते त्यात उतरलेले असतात, त्यांना आपले राजे समजणं बंद करा.

इथे नेते सुद्धा कुणीच नाहीयेत. सगळे प्रतिनिधी आहेत. भरपूर कार्यकर्ते असलेला, अब्जावधींची संपत्ती असलेला, गाड्यांचा मोठा ताफा असलेला, हाती ढीगभर गुंड असलेला माणूस मोठा नेता नसतो, तो जास्तीत जास्त मोठा दहशतखोर असतो. आणि आपण त्याच्या दहशतीला त्याचं कर्तृत्त्व समजत असतो. त्याने कमवलेली संपत्ती आपल्या हक्काच्या पैशातून कमावलेली असते, हेही आपल्याला कळत नसतं. 

आपल्यासाठी कामे करणारा, आपले म्हणणे योग्य ठिकाणी मांडणारा आपला प्रतिनिधी असतो, त्याच्या वैयक्तिक संपत्तीशी किंवा ताकदीशी आपला काही संबंध नसतो. आणि आपला प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी त्याला आपल्याच पैशातून मानधन दिले जाते. ते प्रतिनिधी असतात म्हणून त्या पेमेंट ला मानधन म्हटले जाते, पगार नाही.

संविधान (मराठीमधे राज्यघटना) वाचवणं म्हणजे आपले हक्क ओळखून त्यांचा पुरेपूर वापर करणं असतं, त्यासाठी हातात झेंडा घेऊन आंदोलन करण्याची गरज नसते, राज्यघटना वाचवण्याची भाषा करणारे, त्यासाठी आंदोलने-दंगली करणारे सुद्धा आपल्या घटनात्मक हक्कांची वेळोवेळी पायमल्ली करत आहेत हे आपण ध्यानातही घेत नसतो.

Shrikant Avhad यांची मार्मिक पोस्ट..
close