shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अवैध दारू विक्री वाढली मात्र पोलीसांचे मात्र दुर्लक्ष..!

पुर्णा । प्रतिनिधी :
पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या यशवंत ग्राम कावलगाव येथे मागील काही दिवसापासून पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे अवैध दारू विक्री वाढली असून सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी शाळकरी यांना या तळीरामांचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.यामध्ये दोन दिवसापूर्वी सोळावा पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली परंतु त्यानंतरही अवैद्य दारूविक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मागील दोन दिवसापूर्वी पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथे काही दिवसापासून अवधी दारूविक्री बंद असल्यामुळे काही ग्रामस्थांनी याची खबर चुडावा पोलिसांना दिली पोलिसांच्या पथकाने कावलगाव येथे छापा मारून आरोपी कोंडीबा गायकवाड शिवाजी देशमुख लखन जयस्वाल यांच्याकडून तीन देशी दारूचे बॉक्स जप्त केले घटनास्थळी जाऊन पंचनामा करून तीनही आरोपी प्रकल्पासाठी प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला गुन्हा नोंद झाल्यानंतर एक ते दोन दिवस  विक्री गावांमध्ये बंद होते परंतु मागील दोन दिवसापासून पुन्हा अवैध दारू विक्री डोके वर काढले असून सगळीकडे तळीरामांची दादागिरी सुरू झाली आहे त्यामुळे या भागांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील जनतेच्या वतीने केली जात आहे.
कार्यालयाच्या शेजारील अवैद्य धंदे

तालुक्यातील यशवंत ग्राम कावलगाव येथे विविध बँका व शासकीय कार्यालये आहेत या कार्यालयास बाजूलाच तळ्याचा परिसर असून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे या दारूविक्री मधून लाखो रुपयांची उलाढाल होत असून याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येतात.
close