अहमदनगर । प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्ह्यातील नेहल जोशी हीस महाराष्ट्राचा आदर्श युथ आयडाॅल ज्ञानरत्न पुरस्कार जाहीर. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मार्फत दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील आदर्श गुणिजनांचा गौरव केला जातो. विज्ञान व संशोधन क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी नेहलला 2022 चा राज्यस्तरीय आदर्श युवा ज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.
नेहल सध्या इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेत आहे. 2020 पासून नेहलने आरोग्य विज्ञान म्हणजेच Health Sciences मध्ये संशोधन करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत तिने ब्लड डिसिजेस, न्यूमोनिया व हार्ट ॲटॅक इ. आजारांवर संशोधन केले आहे. या संशोधनासाठी नेहलला 4 राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्याचबरोबर तिचा हा रिसर्च इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल, राईज़ ग्लोबल चॅलेंज, एम.आय.टी. इनोव्हेशन चॅलेंज अशा जागतिक स्तरावरील कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. यापूर्वी नेहलला विज्ञान क्षेत्रातील उत्तुंग प्रगतीसाठी महाराष्ट्राचा स्मार्ट ज्युनिअर सायंटिस्ट पुरस्कार, श्री साई समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
सर्वात विशेष बाब म्हणजे नेहलची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड येथे नोंद झालेली आहे. बॅक्टेरिआ, व्हायरस यामुळे होणारे विविध आजार एक मिनिटात स्पष्ट करण्याचा जगात पहिल्यांदाच तिने रेकॉर्ड केला आहे. लहान वयात नेहलने केलेले संशोधन खरोखरच कौतुकास्पद आहे. शाळा व काॅलेजमध्ये हाती घेतलेले विज्ञानाचे पुस्तक जग घडवू शकते हे नेहलने तिच्या कार्यातून सिद्ध केले आहे.

