shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सिने अभिनेत्री आसु सुरपुर हिचे आगमन होणार


प्रतिनिधी : आसावरी वायकर 

बार्शी : १७ / छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मराठमोळी सिने अभिनेत्री आसु सुरपुर यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून  प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री आसु सुरपुर हिचे  बार्शीत आगमन होणार आहे .

 
 दरवर्षी प्रमाणे बार्शी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते . संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जयंती साजरी केली जाते . कोरोनाचे सर्व  नियम पाळून हा कार्यक्रम होणार आहे . हा कार्यक्रम राजमाता इंदुताई आंधळकर आन्न छात्रलंय देवणे गल्ली बार्शी येथे दि . 19 / 2 / 2022 वेळ सकाळी 11.30 वाजता होणार आहे .

 यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे माजी  मंत्री दिलीप रावजी सोपल साहेब , शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर ,शहर प्रमुख शिवसेना  दीपक भैय्या आंधळकर, बार्शी नगरपालिका विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे, मनीष दादा चव्हाण ,नगरसेवक बापू जाधव,अॅड . सुप्रिया शेखर गुंड पाटील, जिल्हा अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा आयोजक सगीर भाई, सय्यद इलियास भाई शेख, इरफान भाई बागवान , समीर भाई सय्यद, संतोष  भाऊ , सचिन धावारे, अखिल भारतीय चित्रपट मराठी निर्माता महामंडळाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे आदि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत .
close