शाळेलातील मुला मुलींसाठी शौचालयाची उत्तम प्रकारची सोय व्हावी या हेतूने कल्याणी ग्रुप मुंडवा यांनी ई टॉयलेट एक संच भेट दिल्याचे कार्य अभिमानस्पद - विनोद जगताप.
कल्याणी ग्रुप मुंडवा यांच्या सौजन्याने सी आर एस फंड ई टॉयलेट जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे या शाळेस एक प्रकल्प संच भेट.
शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी (तात्याराम पवार): एखाद्या शाळेला मदत कशाची करावी हे गरज जाणून त्याचा विचार करून कल्याणी ग्रुप मुंडवा यांच्या सौजन्याने सी आर एस फंड ई टॉयलेट दर्जेदार प्रकल्प एक संच शाळेलातील मुला मुलींसाठी शौचालयाची उत्तम प्रकारची सोय व्हावी या हेतूने त्यांच्या वतीने करण्यात आली. ही बाब चालू जडणघडणीमध्ये अतिशय कौतुकाची आणि अभिमानस्पद अशी आहे. त्याचे विशेष कौतुक जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे येथे हा प्रकल्प संच भेट देऊन ते प्रत्यक्ष उद्घाटन करून कार्यान्वित केल्याने या ग्रुपचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशा शब्दात जिजाऊ ज्ञान मंदिर चे संस्थापक अध्यक्ष विनोद जगताप यांनी संचाचे उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. आणि कल्याणी ग्रुप मुंडवा यांचे विशेष आभार व्यक्त केले.
कल्याणी ग्रुप मुंडवा यांच्या सौजन्याने सी आर एस फंड ई टॉयलेट (एक संच) प्रकल्प जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे येथील मुली व मुले यांच्यासाठी बसविण्यात आला याचे उद्घाटन कल्याणी टेक्नोफोर्ज लि बारामती चे शिरीषजी देशपांडे (प्लांट हेड), संतोषजी देसाई (प्लांट हेड), दत्तात्रयजी खोमणे ( एच आर एडमिन), संदीपजी जाधव (एच आर एडमिन), राहुलजी सावंत (सी एस आर फंड मॅनेजर ) , मयुरजी जगताप (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजर) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनोद जगताप, प्रिंसिपल शिवमती स्वरांजली विनोद जगताप तसेच सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

