जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी तुषार महाजन यांची नियुक्ती
अहमदनगर | प्रतिनिधी :
शिर्डी येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे तुषार संजय महाजन यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जीवन आधार फाऊंडेशन अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्सचे विदर्भ अध्यक्ष संजीव भांबोरे (कार्यक्षेत्र संपूर्ण भारत) यांनी जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स अहमदनगर जिल्हाच्या अध्यक्षपदी तुषार संजय महाजन यांची नियुक्ती केली आहे.
तसेच सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने तुषार महाजन यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्ये काम केले, यासोबतच समाजातील घडणाऱ्या घटना प्रतिबिंबित करणारे माध्यम म्हणजे पत्रकारिता क्षेत्र यात देखील ते वेळेचा सदुपयोग करत कार्यरत आहेत. सध्या शहराध्यक्ष युवा वॉरियस, जिल्हाध्यक्ष ग्रीन फाऊंडेशन व सोशल तरुणाई फाउंडेशन प्रसिद्धीप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स ही संस्था एनजीओ असून नुकतेच स्कॉटलंडकडून या संस्थेची दखल घेऊन आय.एस.ओ. ने सन्मानित करण्यात आलेले आहे.
त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय संजीव भांबोरे विदर्भ अध्यक्ष, डॉ. शंकर पोवार संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, संजय कदम अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, प्रतिभा पवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला विभाग, युवराज पवार युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, डॉ. शोभा महाजन उपाध्यक्ष महिला आघाडी, तुषार पाटील सचिव महाराष्ट्र राज्य, अरविंद कांबळे सचिव युवक महाराष्ट्र राज्य, राम राठोड विदर्भ उपाध्यक्ष यांना दिलेली आहे.

