शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२२
युक्रेनमध्ये अडकले अहमदनगरमधील विद्यार्थी...!!
अहमदनगर : रशिया-युक्रेन यांच्यात युध्दाला सुरू झाली आहे. यामुळे जगभरातील देशाकडून युक्रेनमध्ये असणार्या त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. नगरमधील एका शिक्षण विषयक काम करणार्या संस्थेने 18 विद्यार्थी युक्रेनला पाठविले होते. हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.
जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नगरसह पुणे, नाशिक या जिल्ह्यातून 40 विद्यार्थी युक्रेनला शिक्षणासाठी पाठविण्यात आले होते.
यात नगर जिल्हा आणि शहरातील 18 विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. हे सर्व विद्यार्थी युद्ध परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये अडकलेले आहे. हे सर्व विद्यार्थी सुखरुप असून त्यांचे वास्तव्य असणार्या ठिकाणी अद्याप युध्दास सुरूवात झालेली नाही.
युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांनी त्यांचे व्हिडीओ तयार केले असून त्यात ते युक्रेनमधील मॉलमध्ये खाद्यपदार्थही मिळणे कठीण झाले आहे. लोक चिंतेत आहेत. येथील सुपर मार्केट बंद होत चालले आहेत.
त्यातील किराणाही संपत चालला आहे. येथे वस्तू महाग मिळत आहेत. येथे एटीएम बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. भारतीय एटीएम कार्डही बंद पडत चालले आहेत, अशी माहिती दिली आहे. तसेच युद्ध परिस्थितीमुळे आमचे शिक्षण व जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आमचे पालकही खूप चिंतेत आहेत. भारतीय दुतावासाकडून सांगण्यात आले हे की आम्हाला येथून बाहेर काढले जाईल. त्यासाठी आम्हाला युक्रेनच्या पश्चिम भागात नेणार आहेत. भारतीय दुतावासाने विमानाची सोय करून आम्हाला आमच्या देशी घेऊन जावे ही आमची मागणी असल्याचे त्यांनी व्हिडीओत नमुद केलेले आहे.
रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. यामुळे युक्रेनमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.
या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. परराष्ट्र खात्याचे मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना याबाबत काळे यांनी ईमेल लिहून त्यांचे लक्ष वेधले आहे.
याबाबत त्यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांचे देखील दूरध्वनीद्वारे संपर्क साधून लक्ष वेधले आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

