शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२२
श्रीरामपुरात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या..!!
श्रीरामपूर : शहरातील गोंधवणी रोड परिसरातील लक्ष्मीनारायण नगर भागात राहणाऱ्या कीर्ती आदिनाथ मोढे,वय 19 वर्ष या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली.
गळफास घेतल्यानंतर साखर कामगार रुग्णालय या ठिकाणी तिला आणले असता रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र जगधने यांनी किर्ती ही उपचारापूर्वीच मयत झाल्याचे पोलिसांना कळविले.त्यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात केली आहे.
विद्यार्थिनी कीर्ती हिने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पंडित हे करीत आहेत.कीर्ती मोढे हिने विद्यार्थी दशेत असताना तरुण वयातच आपली जीवन यात्रा संपविल्यामुळे तिच्या नातेवाईकांसह लक्ष्मीनारायणनगर परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
तरुण मुले-मुली आत्महत्या का करत आहे यावर समाजातील संवेदनशील व जाणकार लोकांनी कार्य करणे आवश्यक आहे जेणेकरुन अशा आत्महत्या रोखल्या जातील.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

