शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२२
अहमदनगरमध्ये ‘पुष्पा’ ! चंदनच चंदन, तब्बल ‘आकरा’ लाखांचे चंदन पकडले..!!
अहमदनगर : तोफखाना पोलिसांनी कारवाई करत तब्बल 370 किलो चंदनाचे लाकडे ताब्यात घेतले आहेत. त्याची किंमत साधारण 11 लाख 84 हजार रूपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इनोव्हा कारमधून चंदनाची बेकायदेशीर वाहतूक करत असताना सदर कारवाई झाली आहे. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.
कार चालक सुभाष भिमराज दिलवाले (वय 47) व राजेंद्र रंगनाथ सासवडे (वय 30, दोघे रा. चिचोंडी पाटील ता. नगर) अशी पकडलेल्या चंदनतस्करांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
आज अर्थात गुरूवारी पहाटे अहमदनगर शहरातील सैनिक लॉन गेट समोर सदर कारवाई पोलिसांनी केली. त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379,34 सह भारतीय वन अधिनीयम 1927 चे कलम 41, 42, 66, 66 (अ) व महाराष्ट्र नियमावली 2014 नियम 82 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांना सदर प्रकाराबाबत गुप्त खबर मिळाली होती.
त्यानुसार पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भिंगारदिवे, दीपक रोहकले, सलिम शेख, गणेश धोत्रे, संतोष गोमसाळे, अमोल गाढे, सोमनाथ राउत, अभय कदम, अतुल काजळे यांनी पहाटे एक वाजेपासूनच चांदणी चौक ते जुने कलेक्टर ऑफीसकडे जाणार्या रोडवर सैनिक लॉन गेट समोरील परीसरात सापळा लावला.
खबर मिळाल्यानुसार पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास राखाडी रंगाची इनोव्हा कार (क्र. एमएच 12 जेयू 5644) पोलिसांनी रोखली. कारची झडती घेतली असता प्लॅस्टीकच्या 17 गोण्यांमध्ये भरलेले 370 किलो चंदन लाकूड हाती लागले.
पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

