shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाईन विक्रिस परवानगी बरोबरच सरकारने शासकीय मालकीची वाईनरीच सुरू करावी -- जनआरोग्य फाऊंडेशनची "उपहासात्मक" टीका

 नगर । प्रतिनिधी:-राज्य शासनाने खाजगी किराणा दुकानात वाईन विक्रीसाठी  परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय समाजघातकी आणि सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे मत जनआरोग्य फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष मा. योगिराज धामणे यांनी व्यक्त केले.  

राज्यातील ७०ते ८० टक्के जनतेला सध्याच्या परिस्थितीत किमान मुलभूत गरजा भागवणे कठीण जात आहे.  त्यातूनच वाढती बेरोजगारी , बदलते हवामान , आरोग्य समस्यांना तोंड देत असताना येथील कमवतावर्ग नैराश्याकडे झुकून व्यसनाधीन बनत चालला आहे. वाढत्या व्यसनाधीनतेने कौटुंबिक वाद , रस्ते अपघात , चोरी , बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडत असताना परीस्थिती बदलण्याऐवजी शासनाने घेतलेला हा निर्णय राज्याला भविष्यात आरोग्य जर्जर तसेच पिछाडीवर घेऊन जानारा आहे.

 राज्यात गुटखाबंदीचा निर्णय घेणाऱ्या सरकारकडून व्यसनाधीनता निर्मूलन , दारुबंदी सारखे कठोर निर्णय होणे अपेक्षित असताना सदरच्या निर्णयाने सरकारी कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. 

"राज्यमहसुलात खाजगी  दुकानात वाईन विक्रिस परवानगी दिल्याने  वाढ होऊन विकास होणार असेल तर शासनाने शासकीय मालकीची वाईनरी सुरु करावी म्हणजे महसुल वाढीबरोबरच  नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील आणि आरोग्यास उपाय झाल्यास उपचारासाठी पैसा उपलब्ध होईल अशी 'उपहासात्मक' टीका मा. योगिराज धामणे यांनी केली".
close