शिरसगाव (बाबासाहेब चेडे): - सुखदेव विश्वनाथ सुकळे यांनी महात्मा गांधी आणि अॅड, रावसाहेब शिंदे यांच्या विचार, कार्याचा आदर्श समोर ठेवून सुरु केलेल्या 'विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा चौथा वर्धापनदिन येथील प्रतिष्ठान कार्यालयात विविध उपक्रमांनी संपन्न झाला. प्रारंभी प्रमुख पाहुणे पत्रकार प्रकाश कुलथे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुण्यथीनिमित्त प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.संयोजक सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष स्व. नामदेवराव सुकळे यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून चार वर्षात प्रतिष्ठानने केलेले कार्य अहवाल सुकळे यांनी सादर केला.प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख उपस्थिती म्हणून संगमनेर येथील सुवर्णकार समाजाचे नेते सुरेश नागरे, खैरी निमगाव येथील आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड,माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे,प्रा. शिवाजीराव बारगळ, डॉ. शिवाजीराव काळे, संमोहनतज्ञ डॉ. रामकृष्ण जगताप,डॉ.प्रकाश मेहकरकर ,पत्रकार बाबासाहेब चेडे, कवयित्री संगीता फासाटे, सुयोग बुरकुले, संकेत बुरकुले आदी उपस्थित होते.
सुभाषराव गायकवाड यांनी नागेबाबा मल्टीस्टेट कॅलेंडर, बुके, दृष्टी पुस्तके देऊन सर्वांचा सत्कार केला.विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने चार वर्षात भरीव सामाजिक योगदान दिल्याबद्दल सुभाषराव गायकवाड यांनी सुकळे यांना सन्मानित करून शुभेच्छा दिल्या.पत्रकार प्रकाश कुलथे यांची श्रीरामपूर प्रेसक्लबच्या खजिनदारपदी निवड झाल्याप्रित्यर्थ प्रतिष्ठानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. सुरेश नागरे यांना शाल, बुके, बुक देऊन सुकळे यांनी त्यांचा सत्कार केला.प्रमुख पाहुणे प्रकाश कुलथे यांनी प्रतिष्ठानच्या सेवाशील वाटचालीचे कौतुक केले, प्रतिष्ठानतर्फे झालेल्या सत्काराबद्दल आनंद व्यक्त करीत सांगितले की, पत्रकारिता ही निर्मळ मनाची तपश्यर्या आहे. मला स्व.अण्णा पेंडसे यांचा आदर्श सहवास, संस्कार लाभले. यशवंत पाध्ये हे मला पत्रकार क्षेत्रात गुरु लाभले, तेव्हापासून माझे जीवन प्रगतीशील झाले असे सांगून प्रकाश कुलथे म्हणाले, मला अधिस्वीकृती समितीतीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली.
पंतप्रधानांची ३२ मिनिटांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली झाली हे विशेष समाधान आहे,पत्रकाराने आपले चारित्र्य आणि चरित्र नेहमी जपले पाहिजे.सेवाभावी मनाने पत्रकारिता करण्यात समाधान आहे.पत्रकाराने निर्व्यसनी आणि सदाचाराचे जीवन जगावे, मला आदर्श साहित्यिक, शैक्षणिक मित्रपरिवार लाभला त्यामुळे मला योग्य ते संस्कार लाभले असून सुकळेसर हे एक आदर्श व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले.
डॉ.रामकृष्ण जगताप यांनी सांगितले की, चांगले कार्य नेहमी मानवी मनाला प्रोत्साहित करते असे सांगत सुकळेसरांच्या मानवसेवेला शुभेच्छा दिल्या. डॉ.शिवाजी काळे म्हणाले, सुखदेव सुकळेसर यांची दृष्टी नेहमी सकारात्मक आहे, अॅड, रावसाहेब शिंदे यांच्या विचार, कार्याशी ते प्रामाणिक आहेत. प्रतिष्ठानतर्फे अॅड, रावसाहेब शिंदे, साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज,डॉ.वा.गो.तथा डॉ. बाबासाहेब कल्याणकर,स्व, सौ. वत्सलाबाई शेळके यांचा नावाने दरवर्षी पुरस्कार देतात अशा त्यांच्या मनाला भावलेल्या पूज्य व्यक्तींच्या नावाने पुरस्कार देणे ही सुकळे सर यांची व्यक्तीकृतज्ञता आहे. ते धनवान नसतील पण प्रामाणिक, निष्ठावान आहेत.
कोणी असे पुरस्कार सुरु केले नाहीत पण सुकळेसर यांच्याजवळ तेवढी मोठी दानत आहे,परिस्थिती नसली तरी उत्कट इच्छाशक्ती आहे असे सांगून सुकळे सरांसारखी ध्येयनिष्ठा माणसे ही भूषणावह असल्याचे सांगितले. डॉ. प्रकाश मेहकरकर , प्राचार्य डॉ. गागरे, सुरेश नागरे, संगीता फासाटे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान म्हणजे सेवेचे ओयासिस आहे. देतो तो देव या कोटीतील हे कार्य आहे.प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजीव शिंदे आणि कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई.शेळके यांचे मोठे सहकार्य प्रतिष्ठानला लाभते, त्यांनी दिलेल्या शुभेच्छा ह्या प्रेरणादायी आहेत असे सांगून पत्रकार प्रकाश कुलथे आणि उपस्थित मान्यवर हे श्रीरामपूरचे भूषणावह संस्कृतीधन आहे,या सर्वांचे प्रेम निरपेक्ष आहे.अशी देवमाणसं आपणास लाभली हे आपले संचित आहे.सकारात्मक विचार करा. कोणाबद्दलही चांगला विचार करा, राजहंसवृत्ती हेच समाधानाचे फळ असल्याचे त्यांनी सांगितले.सूत्रसंचालन संगीता फासाटे यांनी केले तर प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी आभार मानले.

