(समाज बांधवाच्या साक्षीने "समाज कार्यालय"उद्घाटक....अध्यक्ष-संजय खरोटे.)
राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी :- नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे समाजाचे कार्यालय (तात्पुरत्या स्वरूपाचे) समाजाची वास्तूत प्लॉट नं. १३६बी, सेक्टर १/एस.,शबरी हाँटेल जवळ
,नवीन पनवेल येथे बसवून सत्यनारायणाची महापुजा आणि महिला हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आले होते.
२६जानेवारी बुधवार रोजी मंडळाचे अध्यक्ष श्री संजय खरोटे आणि समाज बांधवांच्या साक्षीने समाजाचे कार्यालय (कँबिन) सुवर्णकार समाज बांधवाच्या साक्षीने फीत कापून श्रीफळ वाढविण्यात आले.
यावेळी मंडळाचे सचिव हेमकांत सोनार, कोषाध्यक्ष विजय भामरे,कार्याध्यक्ष धनराज जी विसपुते,महिला मंडळ अध्यक्षा संगिताताई विसपुते, महिला मंडळ सचिव कल्पना सोनार, युवा सचिव,तुषार भामरे,उपाध्यक्ष डॉ. सतिष विसपुते, प्रविण भामरे, डी. एच. विसपुते, पुंजाराम थोरात संस्थापक सदस्य जी एल विसपुते ,नंदकुमार नाशिककर ,जेष्ठ सभासद सी.डी,मोरे,दिपक विसपुते,सह सचिव मनोज सोनार, दिपक वाघ,सहकोषाध्यक्ष पंकज पोतदार आदी अन्य मान्यवर उपस्थित होते.
सदर उद्घाटनप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संजय खरोटे म्हणाले की,समाजाच्या स्वतःच्या वास्तूत कार्यालय तयार करून(कँबिन) सुवर्णकार समाज बांधवाची अनेक पासूनची ईच्छा आज पुर्ण होत आहे. समाज कार्यालय हे समाजाचे हक्काचे व्यासपीठ असून समाज बांधवांसाठी सदैव खुले राहील, यापुढे प्रत्येक समाज बांधवांनी समाज भवन बांधकामसाठी पुढे यायचे आहे असे यावेळी सांगितले.
मकरसंक्रांत चे औचित्य साधून महिला मंडळातर्फे "हळदी कुंकू समारंभ" आयोजित करण्यात आला होता.मकरसंक्रांतींच्या निमित्ताने महिला मंडळाने महिलांना हळदीकुंकू व वाण दिला, यावेळी अध्यक्षा संगिताताई विसपुते, सचिव कल्पना ताई सोनार, शमिका ताई सोनार, अनिता ताई विभांडिक, सारिका ताई बिरारी, डॉ. दिपाली विसपुते इ.आदी महिला भगिनिंची उपस्थिती बहुसंख्येने होती समारंभ उत्साहात संपन्न झाला.
नवी मुंबई सुवर्णकार समाजाचा स्वतःच्या जागेवर प्रथमच कार्यक्रम होत असल्याने सर्व समाज बांधवांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसांडत होता.
या कार्यक्रमासाठी अल्पोपहार व्यवस्था, पुंजाराम थोरात, मंडप डेकोरेशन दिनेश बाविस्कर, तिर्थप्रसाद पंकज पोतदार, चहा आणि पाणी व्यवस्था शमिका ताई सोनार, फोटोग्राफी तुषार भामरे यांनी केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख श्री श्रीनिवास पोतदार,श्री विजय वानखेडे, श्री उदय वाघ,श्री एम.आर.चव्हाण ,डॉ.भामरे,श्री नेरकर ,श्री.उदय विभांडिक,श्री राजेश विभांडिक आदींनी सहकार्य केले.
डॉ .सतिश विसपुते(विभाग प्रमुख) यांचे" स्पंदन हाँस्पिटल"मार्फत कोविड-१९ कोरोना नियमाचे पालन म्हणून सँनिटायझर, मास्क्,तापमान थर्मामिटर इ.ची व्यवस्था करण्यात आली होती.मंडळाचे कार्याध्यक्ष धनराज जी विसपुते हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून ईच्छूक असून त्यासाठी पदवीधर मतदार नोंदणी फाँर्म चे माहितीसाठी दालन लावण्यात आले होते.सोशल डिस्टंसिग पालन करून सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रमासाठी नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका क्षेत्र, रायगड जिल्हा येथील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी सुत्रसंचालन श्री सी.डी.मोरे यांनी केले तर सचिव श्री हेमकांत सोनार यांनी उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले.

