shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निंबोडी ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती उत्साहात साजरी.

निंबोडी ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील निंबोडी ग्रामपंचायत येथे आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी निंबोडी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत निंबोडी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आणि त्यांचे कार्य आजही कायम स्मरणात ठेवून गावाचा विकास कसा करता येईल हा संकल्प या ठिकाणी उपस्थितांनी केला.
 यावेळी सरपंच  रोहिणीताई घोळवे,  उपसरपंच  दत्तात्रय भापकर,  तंटामुक्तीचे महादेव घोळवे,  तंटामुक्तीचे उपाध्यक्ष  सचिन भोईटे, ग्रामपंचायत माजी  सरपंच  हनुमंत   घोळवे,  ग्रामपंचायत सदस्य  संगीता  जगदाळे,  नर्मदा  घोळवे,  रमेश  घोळवे,  विशाल  वाघमारे,  ग्रामसेवक  शेख, शिपाई महादेव  वाघमारे  व इतर ग्रामस्थ  उपस्थित  होते.
close