अध्यात्म हा मानवी जीवनाचा पाया- हर्षवर्धन पाटील
- सणसर येथे तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराचा शुभारंभ
फोटो : सणसर येथे तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धाराचा शुभारंभ प्रसंगी हर्षवर्धन पाटील व मान्यवर.
इंदापूर : प्रतिनिधी दि.19 /2/22
अध्यात्म हा मानवी जीवनाचा पाया आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मन:शांती साठी व सुखी जीवनासाठी मंदिरे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी ( दि. 18) केले.
सणसर येथे तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धाराचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला. संजय निंबाळकर व तानाजी निंबाळकर या बंधूंच्या माध्यमातून हे तुळजाभवानी मातेचे सुंदर मंदिर उभे राहत आहे, याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात समाधान व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, निंबाळकर कुटुंबीयांना पिढ्यान् पिढ्यांपासून धार्मिक वारसा लाभला आहे. समाजावरती चांगले धार्मिक संस्कार होण्यासाठी निंबाळकर कुटुंबीयांकडून मंदिराची होत असलेली उभारणी आनंदाची बाब आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले. यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, पुणे जिल्हा भाजप सचिव तानाजी थोरात, माजी सरपंच विजयसिंह निंबाळकर, संजय निंबाळर, पांडुरंग निंबाळकर, लालासाहेब सपकळ, अमर जगदाळे, पिंटू गुप्ते, संतोष चव्हाण, चंद्रकांत सपकळ, नानासाहेब निंबाळकर, दीपक कदम, जयकुमार निंबाळकर, उमेश सपकळ, मालोजी गायकवाड, संजय पवार, प्रवीण पानसरे, राजेंद्र जाधव, मोहन सुरवडकर, सचिन निंबाळकर, गोकुळ टांगसाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बापुराव कदम यांनी केले.
__________________________

