shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी


शिवभक्त अनिल हराळ यांच्याकडून शिवध्वजास मदत 

 प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

गुंडेगाव : २० /  नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
  सेवानिवृत्त पोलिस बाबासाहेब धावडे, पंचायत समिती सदस्य रविंद्र भापकर, सरपंच जनार्दन माने त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष शाम कासार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती
करण्यात आली.  शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. शिवजयंती निमित्त गावातील नागरिकांनी उत्सवामध्ये सहभागी होऊन छत्रपतींना वंदन केले.

 बाळासाहेब हराळ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र प्रत्येकांसाठी मार्गदर्शक आहे. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही क्षेत्रात त्यांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व यामधून प्रेरणा घेत ते विचार कृतीत आणले तर एक सुंदर समाज निर्माण होऊ शकतो हा विश्वास आहे.

   यावेळी गुंडेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय,छत्रपती शिवाजी महाराज चौकात, न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,समर्थ ज्युनिअर कॉलेज,धावडेवाडी युवा प्रतिष्ठान,स्वाभिमानी प्रतिष्ठान या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.तसेच शिवजयंती उत्साहानिमित्ताने धावडेवाडी युवा प्रतिष्ठान आयोजित कै.राजाराम गंगाराम हराळ यांच्या स्मरणार्थ व अनिल राजाराम हराळ अ.नगर पोलिस यांच्या सहकार्याने ७१ फुटी शिवध्वजाचे अनावरण अनिल राजाराम हराळ यांच्या हस्ते करण्यात आले. रुई छत्तीसी येथील कु.समृद्धी बिभीषण सासवडे हिचे शिवचरित्र व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .या व्याख्यानासाठी परीसरातील महिला मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील शौर्याचे अनेक प्रसंग अनुभवले.

       यावेळी कार्यक्रमाला सरपंच मंगलताई सकट,उपसरपंच संतोष भापकर, ग्रामपंचायत सदस्य संजय कोतकर, सुनिल भापकर, सतिश चौधरी, संदिप जाधव, मेजर भाऊसाहेब चौधरी,भवानी प्रसाद चुबंळकर,कारभारी आगळे, राहुल चौधरी,नारायण भापकर,छबुराव येठेकर, शहाजी भापकर, बबनराव हराळ पाटील, शिवनाथ कोतकर, रावसाहेब कोतकर,डॉ.गजानन भापकर, संदिप भापकर, विकास शिर्के, सचिन जाधव, रघुनाथ धावडे, तसेच शुढळेश्वर ग्रुप, बजरंग युवा प्रतिष्ठान, जयमल्हार ग्रुप, रामेश्वर मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, तिरंगा मंडळ,त्रिदल सैनिक संघटना गुंडेगाव नागरिक महीला विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
close