shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी तालुक्यातील 11 गावांना पाणीपुरवठा योजना साठी 7 कोटी 82 लाख 91 हजार खर्चास प्रशासकीय मान्यता..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 रविवार दिनांक २० फेब्रुवारी २०२२

राहुरी तालुक्यातील 11 गावांना पाणीपुरवठा योजना साठी 7 कोटी 82 लाख 91 हजार खर्चास प्रशासकीय मान्यता..!!

राहुरी : जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत राहुरी तालुक्यातील 11 गावातील योजनांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण होतील अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

    या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे सात कोटी 82 लाख 91 हजार 647 रुपये खर्च येणार आहे यात राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा 30 लाख 59 हजार पाचशे 35 रुपये केंदळ बुद्रुक 53 लाख 48 हजार 330 आरडगाव 79 लाख 95 हजार 856 कोंढवड 72 लाख 32 हजार केंदळ खुर्द 65 लाख 37 हजार 177 रामपूर 30 लाख 24 हजार 673 तांदुळनेर 98 लाख 32 हजार 540 वाघाचा आखाडा 1कोटी 17 लाख 47 हजार 102 डिग्रस 59 लाख 89 हजार 954 चिंचाळे 99 लाख 35 हजार 394 मोमीन आखाडा 78 लाख 89 हजार 55 असा खर्च गृहीत धरण्यात आला असून त्यासाठी 7 कोटी 82 लाख 91 हजार 647 रुपये खर्च येणार आहे जल जीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले राहुरी विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांची मालिका सुरूच ठेवलेली असून रस्ते वीज पाणी या कामांसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगत रस्त्याच्या कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे नमूद केले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close