shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पतंजली योग समिती व युवा भारत इंदापूरच्या वतीने वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकावरती छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा.

पतंजली योग समिती व युवा भारत इंदापूरच्या वतीने वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकावरती छत्रपती शिवाजी महाराज जयंती  उत्सव साजरा. 

 नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे  मालोजीराजे भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले वंदन.

इंदापूर प्रतिनिधी:पतंजली योग समिती व युवा भारत इंदापूरच्या वतीने वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकावरती जयंती उत्सव साजरा करण्यात आला.पतंजली योग समिती आणि युवा भारतच्या नगरपालिकेजवळील स्थायी वर्गातील योगशिक्षक व  साधकांनी ती जागा श्रमदानातून साफसफाई करून स्वच्छ केली आणि त्या ठिकाणी शिवजयंती साजरी केली.
या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने फुलांची आरास करण्यात आली. इंदापूर पीपल्स फाउंडेशन च्या वतीने सुबक रांगोळी घालण्यात आली.इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शिवभक्त प्रतिष्ठानने वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी महिला पतंजली योग समितीच्या सायरा आतार, शिवभक्त परिवाराचे सचिन गोळे,मनोज मोरे विकास भोसले,सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार,योग समितीचे  मल्हारी घाडगे, चंद्रकांत देवकर,किसन पवार,तात्यासाहेब वाघमारे, राजेंद्र चव्हाण,डॉ. विक्रम पोद्दार,सचिन पवार,मंगेश घाडगे,शरद झोळ,अशोक चिंचकर,अल्ताफ पठाण, चंद्रकांत शिंदे,सुनील अहिरे, रवींद्र परबत, प्रशांत गिड्डे ,दत्तात्रय ठोंबरे यांचेसह अनेक शिवभक्त उपस्थित होते.


 
इंदापूर हे शहर वीरश्री मालोजीराजे भोसले यांची जहागिरीअसून १६०५ मध्ये आदिलशहा सरदाराने केलेल्या हल्ल्यात मालोजीराजे भोसले धारातिर्थी पडले.त्यांना इंदापूर मधील ज्या जागेवर वीर मरण आले ती फतेहमंगल गढी म्हणून ओळखली जाते तेथे त्यांचे समाधीस्थळ आहे.दरम्यान गढी संवर्धन व स्मारक समितीने इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून भार्गवराम बागेत शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प करुन मालोजीराजेंचे स्मारक उभारण्यात आले. 
close