पुर्णा:- शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेऊन परत निघालेल्या महिला प्रवाशाची पर्स घेऊन पळणाऱ्या एका महिलेस व इतर आरोपीना. रेल्वे पोलीस परभणी व रेल्वे कर्मचारी यांनी सहकार्य केले. सुरक्षा बलाच्या जवानानी रंगेहात पकडुन अटक केली असल्याची घटना दि.10 फेब्रुवारीच्या राञी 10-30 वाजता जालना रेल्वे पोलीस स्थानका दरम्यान घडली.आरोपीना अटक करुन औरंगाबादच्या न्यायालयात हजर केले असल्याची माहीती हाती आली आहे.
या बाबत असे कि आंध्रप्रदेशातील वेलूर येथील रहिवासी असलेले श्रीनिवास सुब्बाराव येरला हे आपल्या कुंटुबासह शिर्डिला साईबाबाच्या दर्शनाला आले होते.ते काकीनाडा एक्सप्रेस मधुन प्रवास करत असताना राञीच्या वेळी त्याच्या पत्नीने जवळील पर्स उशाला घेऊन झोपल्या असता हि संधीसाधुन आरोपी कान्होपाञा आप्पाराव जाधव.वय 42वर्ष रा. सागर काॕलनी पाथरी,आकाश अनिल मोरे रा.पंचशिल नगर परतुर, आकाश विठ्ठल सुर्यवंशी रा.नादेड. सय्यद सुमिर रा.नांदेड, शेख सोहेल शे.सादीक रा.नांदेड यांच्या विरुध्द परभणी. रेल्वे पोलीसानी गुरन.379.511 अन्वये भादवी प्रमाणे दाखल करुन अटक केली आहे.
परभणी पोलिसांनी औरंगाबाद येथील न्यायालयाकडे त्यांना हजर करण्यात आले. परभणी शहरात रेल्वे स्थानकावर चोऱ्या- दरोडे यांचे प्रमाण वाढले आहे.यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून यावर सक्षम कारवाई होईल का?असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

