shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मामा भाचे यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने वृक्षारोपण


गिर्यारोहक  अनिल वाघ, मयुर म्हस्के यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन...

प्रतिनिधी : शिवा म्हस्के

नगर : दि.१२ /  मनमाड येथील  हबडीची शेंडी या डोंगरावरून प्रस्तरारोहण करताना नगरचे गिर्यारोहक सख्खे मामा भाचे अनिल वाघ आणि मयुर म्हस्के हे दोघे अपघातात जागीच गतप्राण झाले होते.

   छत्रपती शिवाजी महाराजांच्या व‌ राजे संभाजी महाराजांचा विचार ,वारसा पुढे चालू ठेवणारे अहमदनगरचे दोन मावळे अनिल व मयुर गड किल्ले सर करत होते.

 महाराष्ट्राच्या सह्याद्री दऱ्या खोऱ्यात नेहमी चमकणारे तारे मात्र काळाने त्यांना हिरावले.  त्यांचा दशक्रिया विधी मौजे दहिगाव साकत  या ठिकाणी सिना नदी तिरावर पार पडला .

 या वेळी अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.तसेच आथिर्क रक्कम रोख स्वरूपात देखील दिली. अनिल शिवाजी वाघ यांच्या मागे आई, दोन बहिणी, पत्नी , दोन लहान मुले असा परिवार आहे.तसेच मयुर दत्तात्रय म्हस्के यांच्या मागे देखील आई, वडील,बहिण असा परिवार आहे . हे दोघे तरुण घरातील कमावते असल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावुन फूल न फुलाची पाकळी म्हणून आपण देखील मदत करावी असे आवाहन इंद्रप्रस्थ ट्रेकर्स गिर्यारोहक टिमने केले आहे.

१९ फेब्रुवारी रोजी भिस्तबाग चौक  अहमदनगर येथे श्रद्धांजली अर्पित केली आहे. या ठिकाणी दानशूर व्यक्तींनी रोख रक्कम अथवा आँनलाईन बँक खात्यात रक्कम जमा करु शकता. 

पुढे बँक तपशील दिलेला आहे.

अनिल शिवाजी वाघ,
Anil Shivaji wage
Bank of India
A/C no.065810110004648
IFSC code:-BKID0000658
Phone pay & Google pey Number
9850258562
close