shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिखली ग्रामपंचायत येथे २ कोटी ६८ लाख रुपयांची विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न .

चिखली ग्रामपंचायत येथे २ कोटी ६८ लाख रुपयांची विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न .
इंदापूर प्रतिनिधी:चिखली ग्रामपंचायत मध्ये २ कोटी ६८ लाख रुपयांची विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते (३० जानेवारी) रोजी संपन्न झाला.
यावेळी  अमोल पाटील, सचिन सपकाळ , इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, बाळासाहेब पाटील, अॅड.शुभम भैय्या निंबाळकर सुहास  डोंबाळे, , शिवराम अर्जुन, नारायण अर्जुन, सचिन खामगळ राजेंद्र अर्जुन, उपसरपंच संदीप गायकवाड, सरपंच वैशाली सोमनाथ अर्जुन, ग्रामपंचायत सदस्य सौ.सुप्रिया अर्जुन, सौ. हर्षदा पांढरे ,सौ मंगल शेंडगे, उत्तम खोमणे, सौ मीनाक्षी मोरे, तसेच ग्रामसेवक एस. आर. लोणकर, समस्त ग्रामस्थ चिखली इत्यादी उपस्थित होते.
चिखली पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१  अंतर्गत ग्रामपंचायत जनसुविधा विशेष अनुदान तून चिखली अंतर्गत रस्ते खडीकरण करणे २६ लाख रुपये, स्मशानभूमी वॉल कंपाउंड करणे ५ लाख रुपये, गाव अंतर्गत बंदिस्त गटर करणे १० लाख रुपये, सिद्धनाथ सभामंडप करणे ५ लाख, अंतर्गत दलित  वस्ती बंदिस्त गटार करणे १४ लाख रुपये, समाज मंदिर दुरुस्ती करणे १ लाख, अंतर्गत दलित वस्ती रस्ता करणे ८ लाख, जलजीवन मंजूर आराखडा १ कोटी ९९ लाख, एकूण २ कोटी ६८ लाख रुपयांची विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखेचा उद्घाटन समारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, जनतेच्या आशिर्वादाने मिळालेल्या मंत्री पदाचा उपयोग सदैव जनतेच्या हितासाठी करेन.
close