shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवस फेडण्यापुर्वीच आई व चिमुकल्यावर काळाचा घाला...!!


राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने चालू असल्यानेच होतात  नेहमी अपघात..!

पूर्णा ।  प्रतिनिधी :-
परभणी ते झिरो फाटा दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. दरम्यान या कामातील चढ-उताराचा थेट फटका एका ऑटो चालक मालक याला बसला असून दिनांक 1 फेब्रुवारी रोजी नवस फेडण्यासाठी तीन धारा कडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे या आटोला अपघात होऊन या अपघातामध्ये ऑटो मालक-चालक यांना स्वतःच्या पत्नी सह 9 महिन्याच्या चिमुकल्याला गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली असून या अपघातामुळे संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मागील अनेक दिवसापासून कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे, परंतु कोल्हा पाटी ते झिरो फाटा हे काम मागील तीन वर्षापासून रखडले असून या रखडलेल्या कामाचे तीन  कंत्राटदार झाली आहेत. त्यामुळे दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पूर्णा तालुक्यातील बरबडा येथील ऑटो चालक मालक मुंजाजी गोविंदराव शिंदे वय वर्ष 40 हा आपल्या मालकीचा ऑटो क्रमांक mh22 23 90 मध्ये बसून आपली पत्नी पद्मीनबाई शिंदे वय वर्ष बत्तीस व चिमुकला वैभव शिंदे वय  नऊ महिने याला घेऊन नवस फेडण्यासाठी अमवस्या निमित्त आज दिनांक 1 फेब्रुवारी मंगळवारी त्रिधारा येथे जात होता. सकाळी सातच्या दरम्यान झिरो फाटा येथून तो परभणी कडे जात असताना राहाटी पाटीजवळ रस्त्याचे कामामध्ये चढ-उतार असल्यामुळे त्याचे ऑटोला समोरून भरधाव वेगात येणार आहे. अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेमध्ये ऑटोने जाग्यावर तीन पलट्या खाल्ल्या तीन पलट्या खाताच ऑटो मध्ये बसलेली त्याची पत्नी पदमीनबाई मुंजाल शिंदे वय वर्ष बत्तीस ही आटो खाली सापडली व चिमुकला वैभव मुंजाजी शिंदे नऊ महिने हे दोघेजण बाहेर फेकल्या मुले गंभीर जखमी झाली व त्या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान मुंजाजी शिंदे हा चालक मालक हा इस गंभीर जखमी झाला असून घटनास्थळावर पत्नी व लहान मुलगा दगावल्याची बघताच त्यालाही जागेवर चक्कर आली डोक्याला गंभीर मार लागला परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन
जखमी अवस्थेतील मुंजाजी गोविंद शिंदे यांना शासकीय रुग्णालयात परभणी येथे उपचारासाठी दाखल केले 
ताडकळस पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद
दरम्यान ही घटना ताडकळस पोलिस स्टेशन अंतर्गत येत असून या घटनेची नोंद ताडकळस पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे
त्या दोघांवर बर!ब डीयेथे अंत्यसंस्कार
दरम्यान आज घडलेल्या घटनेमध्येबरबडी येथील पदमीनबाई मुंजाजी शिंदे वय वर्ष बत्तीस व वैभव शिंदे नऊ महिने या दोघांवर मंगळवारी दुपारी तीन तीस वाजता बरबडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नवस फेडना पूर्वीच काळाचा घाला...!

दरम्यान या घटनेमध्ये तब्बल पंधरा वर्षानंतर मुंजाजी शिंदे यांना आपत्ते झाल्यामुळे आज अमावस्या निमित्त त्याचा नवस फेडण्यासाठी हे दांपत्य त्रिधारा येथे जात होती परंतु झाला येथे जाण्यापुर्वी नवस फेडणे पूर्वीच त्या चिमुकल्यांसह त्याची आई वर काळाने घाला घातल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे..!
close