शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ मार्च २०२२
मंत्री तनपुरे म्हणतात: वेळ आली तर नगर जिल्ह्यातील 12 मतदार संघातील प्रत्येकाचा करेक्ट कार्यक्रम लावू..!!
अहमदनगर : महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. या अटके विरोधात महाविकास आघाडी तर्फे अहमदनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.तनपुरे पुढे म्हणाले की, आम्ही पाच आमदार पहिल्यांदाच विधानसभेत गेलो. आम्ही नवीनच होतो विधानसभेत. तिथे गेल्यापासून आम्ही पाहतो आहोत की, विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून जे काम व्हायला पाहिजे ते काम न होता. पहिल्या दिवसा पासून आरडाओरडा सुरू आहे.
सुरवातीला आम्हालाही काही कळेना. विरोधी पक्षांनी जनतेचे विधायक प्रश्ने मांडले पाहिजेत. शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडायचे सोडून फक्त गोंधळ घालण्याचे काम त्यांनी विधानसभेत केले. मागील वर्षी विधानसभेत माईकची तोडफोड केली. गचंडी धरण्यापर्यंत मजल जाईल असा त्यांचा आविर्भाव होता. कुठल्याही प्रकारे सत्ता मिळवायची अशा पद्धतीने मागील दोन वर्षांपासून भाजपचे काम सुरू आहे.आम्हीही त्यांच्या सारखं करू शकतो. आम्ही मनामध्ये आणलं तर या अहमदनगर जिल्यातील भाजपच्या माजी आमदार त्याच्यामध्ये तिकडे दिसतील’ मात्र आम्हाला लोक विचारतात, तुम्ही असे का करत नाहीत. महाविकास आघाडीचा आमदार सकाळी सात पासून रात्री 11 वाजेपर्यंत लोकांत असतो. त्यांचे प्रश्न सोडवितो. लोकांच्या प्रश्न सोडविण्याचे काम आमचा प्रत्येक आमदार करतो. त्यांच्या सारखा आम्हाला वेळ मिळत नाही.
खोटे गुन्हा दाखल करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही करतो. त्यामुळे आम्ही त्या बाबत कमी पडलो. मात्र वेळ आली तर 12 मतदार संघातील प्रत्येकाचा करेक्ट कार्यक्रम लावू शकतो मात्र जनतेने आम्हाला याच्यासाठी निवडून दिलेले नाही, असे म्हणत मंत्री तनपुरे यांनी नाव न घेता भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्यावर टीका केली.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

