shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्याच्याकडे 'कट्टा' तोच वाळू धंद्यातला 'पठ्ठा' ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ मार्च २०२२



ज्याच्याकडे 'कट्टा' तोच वाळू धंद्यातला 'पठ्ठा' ..!!

राहुरी मध्ये मुळासह प्रवरा नदीपात्रामध्ये रात्रंदिवस राजरोसपणे वाळू तस्करीला उधान..!!

राहुरी : परिसरामध्ये गावठी कट्टा चा सर्रासपणे वापर केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. गोळीबार झाल्यानंतर पोलीस प्रशासनाची कागदोपत्री फक्त कार्यवाही दिसून येते. परंतु , राहुरीतील पोलीस प्रशासनाला आपल्याच हद्दीतील गावठी कट्टे वापरणाऱ्यांचा शोध घेता आलेला नाही वाळू धंद्यातही ज्याच्याकडे कट्टा तोच आपल्या वाळू धंद्यातला पठा असे सांगत नदीपात्रामध्ये कमरेला गावठी कट्टा लावत वाळूउपसा केला जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नदीपात्रालगत शेतकऱ्यांवर दबाव निर्माण झालेला असल्याची चर्चा आहे.
राहुरी तालुक्यामध्ये मुळा व प्रवरा नदी पात्रांमध्ये रात्रंदिवस उघडपणे आणि राजरोसपणे वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. वाळू उपसा करणारांना नेमके भय कोणाचे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नदीपात्रातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल पडून राहुरी परिसरामध्ये गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असतानाही त्याच्यावर प्रशासनाची होणारी मेहरबानी चांगली चर्चेची ठरत आहे.

मुळा व प्रवरा नदीपात्रामध्ये सुजलाम-सुफलामतेला गवसणी घालणाऱ्या राहुरी परिसराला नदीपात्राची लचके तोडणाऱ्या वाळूतस्करांनी वेढा घातलेला आहे. रात्रंदिवस नदीपात्रातून वाळू उपसा केला जातो. राहुरी तालुक्यातील वाळू ही मुंबई,पुणे,नाशिक या मोठ्-मोठ्या शहरांमध्ये मोठ्या रकमेला विकली जाते. यासाठी स्थानिक तस्करांचे कनेक्शन राज्य स्तरापर्यंत पोहोचलेले आहे आहे.

शासकीय प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नावावर कनेक्शन करणाऱ्यांच्या सर्व सुख सुविधा पुरवणाऱ्या वाळूतस्करांनी आपले बस्तान निर्माण केलेले आहे शासकीय प्रशासन आपल्या खिशात असल्याचा अविर्भावाने सर्वसामान्यांवर दहशत निर्माण केली जाते. एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाची लुट तर दुसरीकडे बक्कळ पैसा कमविल्या नंतर त्या पैशांच्या जोरावर गुन्हेगारांना पोसण्याचे काम वाळू तस्करांकडून होत आहे.

           मुळा नदीपात्रातील बारागाव नांदूर,डिग्रस या हद्दीमध्ये राजरोसपणे ट्रॅक्टर व यारी च्या साह्याने नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना वाढू तस्करांकडून दमदाटी देखील केली जाते. नदीपात्रालगत शेतकऱ्यांना उभ्या पिका मधून वाळूतस्कर वाहनाने ने-आण करतात एकीकडे निसर्गाचा प्रकोप तर दुसरीकडे तोरणाच्या परिस्थितीने शेतकऱ्याच्या आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आसूड उघडणार या वाळू तस्करांचा बंदोबस्त कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

       दरवर्षी वाळू साठ्याचे लिलाव केले जातात. लिलावात हेच वाळूतस्कर एकी करून लिलाव हाणून पाडतात. एखाद्या ठिकाणावरील लिलाव झाल्यास त्या ठिकाणावर ग्रामस्थांवरच दबाव निर्माण करून लिलाव हाणून पाडतात. त्याचा परिणाम पाहता चोरट्या मार्गाने वाळू चोरीला खतपाणी घातले जात आहे.

😷मास्क वरून दंड मात्र वाळूतस्करी कडे दुर्लक्ष"....!!

"मास्क ना घालणाऱ्या कडून लाखो रुपयांचा दंड वसूल करणाऱ्या पोलीस प्रशासनाला ात्र एकही वाळुचे वाहन रस्त्यावर सापडत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी वाळूच्या नावावर हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून असल्याचे दुर्दैवी चित्र आहे त्यामुळे वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन धाडस करत नसल्याचे नेमके गौडबंगाल काय? "

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close