shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना वसंत कनिष्ठ महाविद्यालयाने दिला निरोप समारंभ..!!


  

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
सगळी पाखरं उडतात
घरटे माञ सुने होते
जगाच्या मायाजाळात
सर्व काही उणे होते..!
केज येथील छ.शिवाजी शिक्षण संस्थेच्या वसंत कनिष्ठ महाविद्यालयात कोव्हीड 19 चे नियम पाळून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मधुकरराव नखाते होते तर प्रमुख अतिथी म्हणुन बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे डॉ.एस.एस.जाधव व डॉ.बी.जे.हिरवे,उपप्राचार्य विठ्ठल चव्हाण ,श्री.मोहनराव बरडे  हे उपस्थित होते.या निरोप समारंभाची सुरुवात दिप प्रज्वलन व शिव प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गणेश चाळक  यांनी केले. या  कार्यक्रमात  प्रा.हेमंत देशमुख,  प्रा. गोपीचंद सपाटे,प्रा. नंदकिशोर पारीख व प्रा. सुनिल सोळंके, प्रा.राऊत ,प्रा.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
        
या कार्यक्रमात काही विद्यार्थी व विद्यार्थीनींनी महाविद्यालया विषयी कृतज्ञता भावना व्यक्त केली.
    
या कार्यक्रमात डॉ.बी.जे.हिरवे यांनी शैक्षणिक प्रवासाला मोठ्या धैर्यांने तोंड देवुन प्राप्त परिस्थितीला सामोरे जावुन यश खेचुन आणले पाहिजे असे सांगितले.या कार्यक्रमात "बाप" या कवितेचे वाचन करुन वातावरण भावपुर्ण केले. डॉ.एस.एस.जाधव यांनी जागतिकीकरणात ग्रामिण भागातला विद्यार्थी टिकला पाहिजे असे सांगितले.या कार्यक्रमाचे सुञ संचालन विद्यार्थी तुषार जोगदंड याने केले तर आभार प्रा.गणेश सपाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.पारीख,प्रा.सोळंके,प्रा.राऊत,प्रा.पाटील , प्रा.धपाटे प्रा.रोडे,प्रा.समुद्रे, प्रा.ठोंबरे यांनी परिश्रम घेतले.
close