शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
जालना :- जालन्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात जंगलातील जमीनीवरील गवताळ झाडांना . दि.25 शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास ही आग लागल्याचे लक्षात आले आग कशामुळे लागली याचं कारण अजून समोर आलेलं नाही.
घटनेची माहिती मिळताच बाजूलाच असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी व अग्निशमन दलाने आग विझवण्यास सुरुवात केली. उन्हाच्या कडक्यामुळे आग भडकली हजारो झाडे जळून खाक झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टँकरने पाणी मारून आग विझवण्याचा अटोकाट प्रयत्न करण्यात आला.
आर.पी. टी.एस. पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथील सर्वे न. 201 मध्ये अंदाजे 20 एकर जंगलातील खुल्या मैदानातील गवत असल्याने ही आग वेगाने पसरत गेली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दालाचे 3 बंब लागले तर पोलीस प्रशासनाने टँकर ने आग विझवण्यास मदत केली.दुपारी 12 वा. दरम्यान लागलेली आग 3:30 दरम्यान आटोक्यात आली.
या आगी मध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. नगर पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांनी घटनास्थळी भेट दिली.
अग्निशमन दलाचे फायरमन नितीश ढाकणे, संदीप दराडे, अशोक गाढे, नागेश घुगे, अब्दुल बाशिद, किशोर सगट, रवी बनसोडे, वाहनचालक संजय हिरे, अशोक वाघमारे, पंजाबराव देशमुख यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे परिश्रम घेतले.
.....
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलीसांकडून या परिसरात वृक्षारोपण व जलसंवर्धनाची कामे करण्यात येतात प्राचार्य नामदेव चव्हाण यांनी अतिशय परिश्रमपूर्वक शहरातील समस्त महाजन ट्रस्ट, 100 ₹ सोशल क्लब या सामाजिक सेवाभावी संस्थांच्या सहकार्यातून हे जंगल विकसित केले आहे त्यातील मोठा भाग जळून खाक झालाय सिंदखेडराजा,देऊळगाराजा
रस्त्यावरील वन विभागाच्या जंगलात गेल्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत आहेत या भागात लाकूड तोड व जंगलातील प्राण्यांच्या शिकारी केल्या जातात. दिवसभर मोठ्याप्रमाणात दारूडे या जंगलात येऊन उघड्यावर दारूपार्ट्या करतात दारूच्या रिकाम्या बाटल्या जागोजाग पडलेल्या आहेत .. वन विभाग, पोलीस या खात्यातील एकाही अधिकाऱ्यांसह कर्मचारीवर्ग इकडे फिरकत नाहीत..आग लागल्यानंतर पंचनामे करून त्याच जागेवर पुढल्याच वर्षी वृक्षारोपण करण्यात येते..
......

