शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन):-
आज दि 26/03/2022 रोजी श्रीरामनवमी उत्सव 2022 साजरा करणेसंदर्भात शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त यांची नियोजन बैठक श्री साईबाबा संस्थान मिटिंग हॉल येथे पार पडली.
याप्रसंगी उत्सवाचे नियोजन,स्वरूप आणि रूपरेषा संदर्भात चर्चा झाली.
यावेळी मा. ना.आशुतोष दादा काळे आणि सर्व विश्वस्थानीं श्रीरामनवमी यात्रा कमिटी 2022 चे अध्यक्ष झाल्याबद्दल कमलाकर भाऊ कोते यांचा सत्कार केला.
या बैठकीला साईबाबा संस्थान अध्यक्ष मा ना आशुतोषदादा काळे,उपाध्यक्ष जगदीश सावंत ,सुहास आहेर (विश्वस्त),अविनाश दंडवते (विश्वस्त),सचिन गुजर (विश्वस्त),सुरेश वाबळे (विश्वस्त),महेंद्र शेळके (विश्वस्त),डॉ एकनाथ गोंदकर (विश्वस्त), जयंतराव जाधव (विश्वस्त) श्रीरामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर भाऊ कोते,कैलास बापू कोते,अभय भैय्या शेळके,जगन्नाथ गोंदकर,रमेशभाऊ गोंदकर,विजुभाऊ कोते,नितीन कोते,केशवराव गायके,दत्तूभाऊ कोते,मंगेशनाना त्रिभुवन,प्रमोद गोंदकर, सलीम भाई शेख, सुधाकर शिंदे,आप्पासाहेब कोते,प्रताप कोते,दीपक वारुळे ,मधुकर कोते, विनायक कोते,सुनील शेळके,चेतन कोते,नितीन कोते,राहुल गोंदकर,दादा गोंदकर, नितीन शेळके,विकास गोंदकर,अतुल कोते,संतोष जाधव आदी शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

