shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्र सरकारच्या विरोधात डिझेल-पेट्रोल-गॅस दरवाढीच्या विरोधात केज तालुका शिवसेनेचे निषेध व बोंब मारो आंदोलन...!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे  यांच्या आदेशावरून,संपर्क नेते मा.चंद्रकांत खैरे ,बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव ,सहसंपर्क प्रमुख बाळासाहेबजी अंबुरे  यांच्या मार्गदर्शनाखाली,शिवसेना बीड जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव  यांच्या सुचनेवरुन,केज तालुका शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक - २६ मार्च २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात डिझेल-पेट्रोल-गॅस दरवाढीच्या विरोधात केंद्र शासनाचा निषेध करण्या करीता महिलांनी चुल मांडुन स्वयंपाक केला व शिवसैनिकांनी गॅसच्या टाकीला आणि मोटारसायकलला हार घालुन शिवसैनिकांनी मोदि सरकारच्या निषेधार्थ बोंबाबोंब मारुन तीव्र आंदोलन करुन घोषणाबाजी केली.
             

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वातावरण शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणुन गेले होते.या आंदोलनात केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे,म.आ.ता.प्र.मनोरमाताई डोईफोडे,युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात,तालुका संघटक बाळु पवार,तालुका संघटक अशोक जाधव,युवती ता.प्र.अश्विनी बडे,उपतालुकाप्रमुख विकास काशिद,अभिजीत घाटुळ,सुग्रिव सक्राते,चंद्रकांत इंगळे,सचिव आश्रब शेख, उपशहरप्रमुख पप्पु ढगे,प्रसिद्धी प्रमुख ज्योतिकांत कळसकर,माजी युवासेना शहरप्रमुख तात्या रोडे,वाहतुक सेना तालुका प्रमुख सुधीर जाधव,शहरसंघटक अमोल चौधरी,शिवाजी बोबडे,विधानसभा अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे,शिवाजी चौरे, शाखाप्रमुख राहुल घोळवे,साहेबराव शिंदे,दत्ता अंधारे,सुधीर ठोके,राहुल अंधारे,अमोल घुले,गब्बर भाई शेख सह शिवसैनिक व महिला उपस्थित होत्या.
close