प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री . उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण मराठवाड्यात शिव संपर्क अभियान अंतर्गत शिवसेनेचे खासदार व मुंबईतील शिवसेनेचे महत्वपूर्ण पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठका- मिळावे घेऊन शिव संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये शिवसेनेचे मराठवाडा संपर्क नेते माजी मा.चंद्रकांत खैरे , बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदजी जाधव , यांच्या मार्गदर्शनाखाली
धाराशिव जिल्ह्याचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर यांच्या विशेष प्रमुख उपस्थितीत मुंबईचे अकरा शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत व माजी मंत्री. जयदत्त आण्णा क्षीरसागर , सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना बीड जिल्हा प्रमुख आप्पा साहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली
दि. 22 मार्च 2022 मंगळवार रोजी दुपारी 4:30 वाजता केज शहरातील शिक्षक पतपेढी पंचायत समिती मागे उमरी रोड केज येथे शिवसेनेच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप महिला आघाडी, सहसंपर्कप्रमुख, रत्नमाला ताई मुंडे. महिला राज्य, आयोगाचे सदस्य संगीता ताई चव्हाण उपजिल्हाप्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी सौ चंद्रकला ताई बांगर शुभमजी डाके सह शिवसेना युवासेना महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी हजर राहणार आहेत. तरी केज विधानसभा मतदार संघातील शिवसेना महिला आघाडी, युवासेना, वाहतूक सेना, ॲटो युनियन सेना.
पदाधिकारी शिवसैनिकांनी तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी आजी-माजी पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित रहावे. असे आव्हान केज तालुका. प्रमुख रत्नाकर शिंदे व आंबेजोगाई तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे यांनी केले आहे.


