सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक येथील घटना...
हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२०,हिंगोली जिल्हयातील सेनगाव तालुक्यातील कहाकर(बु) येथे हळद शिजवणाऱ्या कुकरचा स्फोट झाल्याने चार जण गंभीररीत्या भाजून जखमी झाल्याची दुर्देवी घटना दि.१९ मार्च शनिवार रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक येथील देवराव पोपळघट यांच्या शेतात हळद शिजवण्याचे काम सुरू होते त्यासाठी संदीप पोपळघट यांनी त्यांच्या मालकीचे कुकर शेतात आणले होते रात्री नऊ वाजन्याच्या सुमारास देवराव पोपळघट,संदीप पोपळघट,अजय अमृता खंदारे व कांबळे असे चौघेजण काम करत होते.त्यांनी कुकर मधे पाणी टाकले व कुकर खाली जाळ पेटवला मात्र या वेळी कूकर असलेली शिट्टीचे लॉक झाल्यामुळे काही वेळानंतर कुकर तापले नाही असे समजून चौघेजण हि कुकर जवळ जेवणासाठी बसले अर्धातासा पेक्षा अधिक काळ होऊन देखील शिट्टी झालीच नाही .अद्याप कुकर मधील पाणी तापले नाही असे समजून चौघेजण निवांत जेवन करत बसले होते
मात्र कुकर मध्ये वाफेचा दाब येऊन कुकरचा स्फोट झाला यामध्ये कुकरच्या तीन ही टाक्या उडून बाजूला पडल्या कुकरमधील गरम पाणी व हळद या चौघाच्या अंगावर पडली या मधील हे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान शेतामधून मोठा आवाज आल्याने परिसरातील शेतकरी धावत घटनास्थळी दाखल झाले त्या ठिकाणी चौघेजण गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत दिसून आले या चौघाना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले यामध्ये कांबळे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्याना उपचारा साठी नांदेडला हलवण्यात आले आहे तर दोघे जण अकोला येथे तर एकास वाशिमला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


