shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इतरांच्या सुखामध्ये आपले सुख असते - ज्ञानदेव शिंदे

इतरांच्या सुखामध्ये आपले सुख असते - ज्ञानदेव शिंदे.

मैत्री फाउंडेशन सदस्याच्या वतीने अभिनव उपक्रम.. आळंदीत केले बेघर मुक्कामी असणाऱ्या लोकांना पुरणपोळीचे अन्नदान.
इंदापूर प्रतिनिधी:इतरांच्या सुखामध्ये आपले सुख असते याचे दर्शन ही या आळंदी या ठिकाणी आम्हास पाहण्यास मिळाले असे मैत्री फाऊंडेशन यांच्या वतीने होळीनिमित्त आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर परिसरातील बेघर असणारे लोक यांना पुरणपोळी देऊन अन्नदान करण्यात आले. त्यावेळी मैत्री फाऊंडेशनचे सदस्य ज्ञानदेव शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले.
मैत्री फाउंडेशनच्यावतीने प्रथमच अशा पद्धतीचे समाजसेवी कार्य होत असल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक विशेष पद्धतीने होत असल्याचे दिसून आले.
मैत्री फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम राबवली जात असून होळी सणानिमित्त बेघर आळंदी परिसरामध्ये मुक्कामी असतात. त्यांना होळीच्या सणाचा आनंद मिळावा यासाठी पुरणपोळ्या चे वाटप करून एक मानसिक आनंद उत्सव या निमित्ताने मिळाला. पुरणपोळ्या चे वाटप करत असताना त्यांचा आनंद हाच आमचा आनंद असल्याचं आम्हाला जाणवलं
 त्यामुळे आमच्या या कार्यात आम्हाला अधिकच प्रोत्साहन मिळाले असून पुढील काळामध्ये ही असेच समाजोपयोगी कार्य आमच्या हातून अधिक जोमाने घडेल असे आमच्या मैत्रीत फाउंडेशनच्या सर्व सभासदांना वाटू लागले आहे. इतरांच्या सुखामध्ये आपले सुख असते याचे दर्शन ही या ठिकाणी आम्हास पाहण्यास मिळाले असे मत मैत्री फाऊंडेशनचे सदस्य व इंदापूर तालुक्यातील बोरी गावचे सुपुत्र ज्ञानदेव शिंदे यांनी माहिती देताना आपले मत व्यक्त केले.
आळंदी येथे मैत्री फौंडेशनचे  राजेंद्र गोरे, शैलेश जाधव , ज्ञानदेव शिंदे,  मनोज गुंजाळ, सौ वैशाली शिनलकर,  गणेश ताजने,  गोरख जाधव ,कु. दिव्या धोंडगे आणि कु. वैष्णवी जाधव आदी सदस्य उपस्थित होते.
close