shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१३५) पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता ग्राहक साक्षरता : पर्यावरण रक्षणातील पहिले पाऊल


पर्यावरणाचे संवर्धन,संतुलन आणि रक्षण ही मानवाची गरज आहे आणि आपल्या अमर्याद गरजा भागविण्यासाठी माणूस पर्यावरणालाच ओरबाडतो आहे. हे दुष्टचक्र आपण अनुभवतो आहोत.

निसर्गातील असंख्य वस्तू,  वनस्पती, धातु, पदार्थ, जल, स्थल, काष्ट, पाषाण यांमधूनच आपण आपल्या गरजा भागवतो.  म्हणजे आपण ग्राहकाच्या भूमिकेत असताना ग्राहक म्हणून  निसर्गाकडून जे घेतो,
ते घेत असताना निसर्गाचा समतोल राखणे ही ग्राहकांची जबाबदारी नाही का ?
अगदी उदाहरणच द्यायचे तर सार्वजनिकहितार्थ आपण एखाद्या मैदानाचा वापर करतो तेव्हा वापरानंतर ते मैदान  स्वच्छ करून देणे ही आपली जबाबदारी नसते का? एखाद्या वृक्षाखाली आपण निवांत सावलीत विसावा घेतो त्यावेळेला त्या वृक्षाचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने वर्तणूक हे आपले कर्तव्य नाही ठरत का?
 तर प्रत्येकाने निसर्गाकडून आपणास जे प्राप्त होत आहे, होणार आहे त्याचा योग्य विनियोग आणि ते पुन्हा मिळावे यासाठी योग्य कार्यवाही , एवढा जरी विधीसंकेत बाळगला आणि पर्यावरण रक्षण हा विषय मनामध्ये संस्कारित केला, उठता-बसता याचा प्रचार केला तरी यामुळे पर्यावरणाचे निश्चितच रक्षण होऊ शकेल. प्रत्येक व्यक्ती हा निसर्गाचा ग्राहक असूंन पर्यावरण रक्षणासाठी एक सैनिक म्हणून उभा राहू शकतो व निसर्गाचे रक्षण करू शकतो. पर्यावरणाचे संतुलन करू शकतो.
 पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता उपक्रमांतर्गत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या विद्यमाने प्रकाशित.

लेखक : 
पुण्यरत्न डॉ.चंद्रकांत शहासने, पुणे
(देशभक्तकोशकार)
मोबाईल क्र : ९८८१३७३५८५
close