shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमृत नगर परिसरामध्ये एका 35 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या..!

पूर्णा । प्रतिनिधी :-
पूर्ण शहरातील अमृत नगर परिसरामध्ये एका 35 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पूर्णा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पूर्ण शहरातील अमृत नगर परिसरामध्ये राहणारा मयत युवक अविनाश चंद्रकांत सूर्यवंशी वय वर्ष 35 हा वाजेगाव जिल्हा नांदेड येथे स्वतःची लेप चालवीत होता स्वतःची द्या चालवीत असताना काही दिवसापासून याचा व्यवसाय चालत नसल्यामुळे तो निराश या अवस्थेमध्ये जीवन जगत होता सोमवार दिनांक 21 मार्च सायंकाळी रात्री नऊच्या सुमारास सदर युवकाने आपल्या राहत्या घरी पूर्णा येथे मध्यरात्री एका लोखंडी कडीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 या घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना मिळाल्यानंतर दिनांक 22 मार्च रोजी मंगळवारी सकाळी घटनास्थळाला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश झाले यांनी पाहणी करून घटनास्थळ पंचनामा केला व या प्रकरणी मयताचा भाऊ शशिकांत सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूर्णा पोलिस स्थानकामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अविनाश याच्या पश्चात एक मुलगा पत्नी असा परिवार असून या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

close