पूर्णा । प्रतिनिधी :-
पूर्णा तालुक्यातील एका शेतकऱ्याने खरेदी केलेला कडबा जनावरांसाठी गावाकडे घेऊन जात असताना रस्त्यालगत असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या तारेसी कडब्याने भरलेल्या ट्रॅक्टरचा संपर्क झाल्यामुळे ट्रॅक्टर मधील 2000 कडबा जाग्यावर जळून खाक झाल्याची घटना घडली असून परिसरातील शेतकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली आहे.
अधिक माहिती अशी की पूर्णा ते कंठेश्वर रस्त्यावरील राज्यमार्गावर दिनांक 21 मार्च सायंकाळी पाचच्या सुमारास पूर्णा येथून 2000 कडबा घेऊन ट्रॅक्टर क्रमांक एम एच 22 एम 46 93 हा शेख सिकंदर हा घेऊन कंठेश्वर कडे जात होता.
दरम्यान सायंकाळी पाचच्या सुमारास पूर्णा शिवारामध्ये विद्युतीकरण वाहिनीच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तारेसी या कडव्ब्याने भरलेल्या ट्रॅक्टरचा संपर्क आला. तारा व ट्रॅक्टर वरील कडबा एकमेकांना जवळून घर्षण झाल्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या तारांच्या ठिणग्या उडाल्या व ट्रॅक्टरवर पडल्या. त्यामुळे पाहता पाहता या ट्रॅक्टरने पेट घेतला.कडब्याने भरलेली ट्रॅक्टर ट्राॅली जळत असल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकरी या ट्रॅक्टर चालकाच्या मदतीला धावले.ट्रॅक्टर चे हेड बाजूला करून चालक व परिसरातील शेतकऱ्यांनी त्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटी करून दिली.
त्यामुळे लागलेली आग आटोक्यात आली. दरम्यान या घडलेल्या घटनेमुळे सदर ट्रॅक्टर मधील 2000 कडबा जळून खाक झाल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांचा चारा असलेला कडबा जळाल्यामुळे वीस हजार रुपयाचे सदर शेतकऱ्याचे नुकसान झाले असून या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

