उन्हाची वाढलेली तीव्रता पाहता शाळा सकाळच्या सत्रात घ्याव्या. - शिक्षक समितीची मुख्यकार्यकारी अधिकारी पुणे यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी.
इंदापूर प्रतिनिधी: दि २९ उन्हाची वाढलेली तीव्रता, पिण्याच्या पाण्याची कमतरता , भारनियमन अशा समस्या पाहता पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देवून एप्रिलमध्ये शाळा सकाळच्या सत्रात घ्याव्या अशी मागणी केली आहे.
दि २४ रोजी शालेय शिक्षण विभागाने कोवीड काळात झालेले शैक्षणीक नुकसान भरुन काढण्यासाठी एप्रिलमध्ये पूर्ण वेळ शाळा घ्याव्या असे सांगितले. याविषयी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर निवेदन देताना म्हणाले उन्हाची प्रखरता , ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा आभाव , शाळेत वीज कनेक्शन नसणे , भारनियमन यामुळे मुलाचे आरोग्य विषयक समस्या निर्माण होवू नयेत. पालक , शिक्षक , मुले सर्वांची मागणीचा विचार करुन शाळा सकाळच्या सत्रात घ्याव्या अशी प्रशासनास विनंती करण्यात आली आहे असे सांगितले.

