shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेवाशाच्या तहसीलदारांवर गुन्हा दाखल : करोना काळात कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याचे प्रकरण..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. बुधवार दिनांक १६ मार्च २०२२

नेवाशाच्या तहसीलदारांवर गुन्हा दाखल : करोना काळात कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याचे प्रकरण..!!


नेवासा : करोना प्रादूर्भाव प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना जमा होण्यावर बंदी, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आदी सक्ती केलेली असतानाही या नियमांचे पालन न करता नेवाशाच्या तहसीलदारांनी 10 ते 15 कर्मचार्‍यांसमवेत 23 जून 2020 रोजी कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याच्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने नेवासा पोलीस ठाण्यात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संजय जानकू नारळे (वय 44) धंदा-शेती रा. माळीचिंचोरे ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी स्वतःचा वाढदिवस शासकीय कार्यालयात 10 ते 15 कर्मचार्‍यांसह मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता व 5 पेक्षा जास्त व्यक्ती जमून धुमधडाक्यात साजरा केला होता. याबाबत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. मात्र तरीही तहसीलदार यांच्यावर कारवाई न केल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद कोर्टात क्रिमीनल रिट पिटीशन दाखल केले होते. न्यायालयाने 30 जुलै 2021 रोजी निकाल देवून संबंधीत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.



या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर शासकीय कार्यालयात स्वतःचा वाढदिवस साजरा करताना मास्क न लावणे, पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमवणे असे कृत्य करुन जिल्हाकिारी यांच्या 31 मे 2020 च्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270, 51(ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close