shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यातील अपहरण केलेल्या ऊसतोड मुकादमाचा शीर धडा वेगळे करून निर्घृण खून !!




बारा लाखच्या मागणीसाठी एकाचे अपहरण केलेल्या मुकादमाचे बिना मुंडक्याचे धड हिरण्यकेशी नदीत सापडले : मुंडक्याचा तपास सुरू  !


अमानुष मारहाण करून पैसे न दिल्यास कापू टाकू म्हणीत जीवे मारण्याची धमकी खरी ठरली !

----------------------------------------------
प्रकाश मुंडे  |  बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 
केज तालुक्यातील लव्हुरी येथील सुधाकर चाळक यांचे वडवणी येथील एका हॉटेलमधून अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण करून त्यांच्या मुलांना त्यांची सुटका करण्यासाठी १२ लाख रुपयांची मागणी केली जात होती. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर जर पैसे आणून दिले नाहीत तर कापून टाकू अशी फोन वरून धमकी दिली होती. अपहरण कर्त्यांनी अत्यंत थंड डोक्यांनी कट रचून अत्यंत निर्दयीपणे नियोजन पूर्वक सुधाकर चाळक याचे शीर धडावेगळे करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने शीर नसलेले धड हिरण्यकेशी नदीत फेकले. तर तेथून पुढे १० किमी अंतरावर डोके फेकुन  विल्हेवाट लावली. त्याचा केज पोलिसांचे पथक ते शिराचा तपास घेत आहे.



या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील लव्हुरी येथील सुधाकर उर्फ सुदाम चाळक हे महालक्ष्मी साखर कारखाना तेर येथे मजूर पुरवठा अधिकारी म्हणून काम करीत होते. 

त्यांचे दि. १६ फेब्रुवारी रोजी लव्हुरी येथून त्यांना वडवणी येथे बोलावून तेथून काही अज्ञात लोकांनी अपहरण केले. 

त्यामुळे दि. २५ रोजी त्यांच्या नातेवाईकांनी चाळक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दि.२७ रोजी त्यांचा भाऊ व मुले यांना चाळक यांच्या फोन वरून अज्ञात लोकांनी फोन केला. अपहरणकर्ते हे सुधाकर उर्फ सुदाम चाळक यांच्या सुटकेसाठी १२ लाख रुपयांची मागणी करीत आहेत. तसेच त्यांना अमानुष मारहाण करीत असल्याचा कॉल रेकॉर्डिंचा आवाज ऐकू येत असून सुधाकर चाळक हे मारहाणीमुळे विव्हळत असल्याचे त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत होते. 

अपहरणकर्त्याला त्यांचा मुलगा हा मारहाण न करण्याची विंनती करीत होता. तरी देखील ते अमानुष व बेदम मारहाण करीतच होते. अपहरणकर्ते हे हिंदी भाषेत बोलत होते व शिवीगाळ करीत होते. सुटकेसाठी ते कर्नाटक येथील शंकेश्वर साखर कारखान्यावर पैसे घेऊन येण्याची मागणी करीत होते. जर पैसे आणून दिले नाहीत तर कापून टाकू व जीवे मारू अशी धमकी त्यांनी फोनवरून दिली होती.

दि. २८ फेब्रुवारी रोजी अक्षय चाळक याने त्याचे वडील सुधाकर चाळक यांचे अज्ञात अपहरणकर्त्यांनी अपहरण करू मारहाण करून पैशासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी गु.र.नं. ६१/२०२२ भा.दं.वि. ३६४(अ), ३६५, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सय्यद हे तपास करीत आहेत. त्या नंतर हा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.

सर्व माहितीची व कॉल रेकार्डची माहिती घेऊन सीडीआर वरून दि. रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील

यांनी संशयित आरोपी तुकाराम मुंडे, चारदरी ता धारूर जि बीड, रमेश मुंडे रा कोठरबन ता वडवणी जि. बीड दत्तात्रय हिंदुराव देसाई (वय ५८ वर्ष) रा. कडगाव ता. भुदरगड जि कोल्हापूर यांना ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपी दत्तात्रय हिंदुराव देसाई (वय ५८ वर्ष, रा. कडगाव ता. भुदरगड याने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले की, त्यांनी सुधाकर चाळक यांचा खून करून त्याचे मुंडके धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्यासाठी ते धड पोत्यात बांधून कोल्हापूर जिल्ह्यायील नांगनूरजवळ हिरण्यकेशी नदीत फेकण्यात आलयाची व शीर तिथून पुढे १० किमी अंतरावर पाण्यात फेकले आहे. संशयितांना घेऊन पोलिस नांगनूरच्या हिरण्यकेशी पुलावर सोमवारी दाखल झाले. त्यांनी गडहिंग्लजच्या पास रेस्क्यू टीमला घेऊन मृतदेहाचा शोध घेतला; सायंकाळी नदीपात्रात मृतदेह सापडला आहे मात्र मंगळवारी सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत पणबुड्यांच्या मदतीने ते मुंडक्याचा तपास सुरू आहे परंतु अद्याप त्या शिराचा तपास लागलेला नाही. 

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे यांनी केलेल्या अथक प्रयत्न आणि तपासामुळे या अत्यंत थंड डोक्याने आणि अत्यंत नियोजनपूर्वक अपहरण करून पुरावा नष्ट करण्याचा केलेल्या खुनाचा उलगडा केला आहे.आता या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुधाकर चाळक यांच्या खून प्रकरणी खुनाचा व पुरावा नष्ट करणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

----------------


close