shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोखळी येथे ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी ७ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ होणार.

गोखळी येथे ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी ७ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ होणार.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील गोखळी गावात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली गोखळी गावातील ७ कोटी ७५ लाख रुपयांची विविध विकास कामाचे भुमिपुजन तसेच आरोग्य उपकेंद्र चे उद्घाटन समारंभ व जाहीर सभेचे आयोजन दिनांक १८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आल्याची माहिती सरपंच सौ. अलका बापू पोळ व उपसरपंच सचिन तरंगे यांनी दिली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, अभिजीत तांबिले व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे हे असून प्रमुख उपस्थिती मधुकर भरणे, प्रताप पाटील, सचिन सपकळ, अतुल झगडे, शशिकांत तरंगे, हनुमंत बंडगर, विजयकुमार परीट, स्वातीताई शेंडे, बाळासाहेब करगळ, संजय सोनवणे, शुभम निंबाळकर ,सतीश पांढरे, छायाताई पडसळकर ,डॉक्टर जीवन सरतापे, सागर मिसाळ ,अशोक चोरमले, लक्ष्मण हरणावळ, शिवाजी इजगुडे, नवनाथ रुपनवर, दशरथ डोंगरे, हेमंत पाटील, बाळासाहेब ढवळे, हमा पाटील, विशाल मारकड, तुकाराम करे, युवराज पोळ, बाळासाहेब चितळकर, संतोष जाधव, पोपट शिंदे, संजय व्यवहारे, दीपक देव्हारे, राजेंद्र झगडे, बापू बंडगर, शंकर करे, रोशन तूमसुरे, सुनील खामगळ, वसंत मारकड, योगेश डोंबाळे, सुहास बुट्टे, शिवराज गावडे, सागर उंबरे, आजिनाथ मारकड, माऊली शिंदे, कांतीलाल तरंगे, तसेच ग्रामसेविका अस्मिता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम वाघमोडे, बापू पोळ ,सोमनाथ झगडे, सौ. रेखा झगडे, सौ. लता अभंग, सौ. कावेरी पारेकर, सौ.नंदा चितळकर, सौ. मनीषा महानवर व ग्रामस्थ राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सरपंच सौ अलका पोळ व उपसरपंच सचिन तरंगे यांनी सांगितले.
close