शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. बुधवार दिनांक १६ मार्च २०२२
पिण्याची पाणी पुरवठा योजना बंद असल्याने संतप्त महिलांनी सरपंच, उपसरपंचासह पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठोकले टाळे..!!
राहुरी : गेल्या एक वर्षापासून पिण्याची पाणी पुरवठा योजना बंद असल्याने तात्काळ ही योजना सुरू करावी या मागणीसाठी संतप्त महिलांनी कोपरे शेणवडगाव ग्रुप ग्रामपंचायतीवर धडक हंडा मोर्चा काढत सरपंच, उपसरपंचासह पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडत टाळे ठोकण्यात आले. ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी जर नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आल्याने धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या एक वर्षापासून पिण्याची पाणी पुरवठा योजना बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परंतु प्रशासनाने याकडे सतत दुर्लक्ष केल्याने अखेर महिलांनीच थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. तसेच पाणी पुरवठा योजना तातडीने सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर संतप्त महिलांनी सरपंच, उपसरपंचासह पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून टाळे ठोकण्यात आले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. महिलांच्या या आक्रोशानंतर पाणी पुरवठा योजना कधी सुरू होणार आता याकडेच लक्ष लागले आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

