शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. बुधवार दिनांक १६ मार्च २०२२
स्व. शिवाजीराजे गाडे पाटिल यांचा वारसा जि.प.सदस्य धनराज गाडे पाटिल चालवताना नुकताच घडलेला प्रसंग..!!
अहमदनगर : स्वर्गीय शिवाजीराजे गाडे पाटिल यांनी तालुक्यात शेतकरी विकास मंडळाची स्थापना करून शेतकरी, गोरगरीब व वंचितांना न्याय देण्यासाठी राजकारण, सामाजिक कार्य केले. तोच वारसा जि.प.सदस्य धनराज गाडे पाटिल हे चालवताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय लोकांना आज दिसुन आला.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांबरोबर उपोषणाला बसलेले असताना कृषी विद्यापीठ च्या पेट्रोल पंपासमोर एक दुर्दैवी अपघात झाल्याचे दिसले. उपोषण सुरू असतानाही अपघात झालेला दिसताच मदतीसाठी स्वतः जि.प.सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे पाटिल यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमी वावरथ जांभळी येथील ओळखीचे पिराजी बाचकर व त्यांची मंडळी हे असल्याचे समजताच वेळ वाया न घालवता तात्काळ सर्व यंत्रणाना बोलावून त्या अपघातग्रस्तांना तात्काळ हाॅस्पीटलला पोहचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. परंतु दुर्दैवी वावरथ जांभळी येथील मित्र पिराजी बाचकर यांचे हाॅस्पीटलला निधन झाले. यात त्यांची पत्नीला वाचविण्यात यश आले.
स्व. शिवाजीराजे गाडे पाटिल यांचा वारसा जि.प.सदस्य धनराज गाडे पाटिल चालवताना नुकताच घडलेला प्रसंग
जि.प.सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे पाटिल यानी केलेल्या या तत्परतेमुळे एका जीवाचे प्राण वाचले. उपोषणाला आज तीन दिवस झाले आहे. अन्नपाणी त्याग करून सर्व सामान्य शेतकरी च्या हक्कासाठी लढणारे तालुक्यातील एकमेव युवा नेतृत्वाला या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी उपोषणाला बसावे लागत आहे. लवकरात लवकर या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा हीच तालुक्यातील जनतेतून मागणी होत आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

