श्रीरामपूर (प्रतिनिधी): - दैनिक सार्वमतचे प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई हे राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील विविध कार्यकारी सोसायटी संचालक पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
पत्रकारीते सोबतच पंचक्रोषात त्यांचे सातत्याने चालणारे सामाजिक कार्य देखील मोठे असल्याने त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्थरातून त्यांच्यिवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समता फाऊंडेशन चे शौकतभाई शेख,अन्सार शेख,अमोल शिरसाठ,रमेश जेठे (सर) असलमभाई सय्यद,राहुल कोळगे तसेच महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकतअली,शेख फकीर मोहम्मद,बी.के. सौदागर,नासीर पठाण, फिरोज पठाण,अमीर जहागीरदार,राजमोहम्मद के शेख,उस्मान के. शेख,वहाब खान पठाण,असलम रंगरेज,सुखदेव केदारे,सूर्यकांत गोसावी,हाजी शकील शेख,कालिदास अनावडे, राजमोहम्मद आर.शेख, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष आसलम बिनसाद, मो.हनिफ तांबोळी,सलाउद्दीन शेख,एजाज सय्यद, सुभाषराव गायकवाड, रियाजखान पठाण,गुलाबभाई शेख,इम्रान शेख,सलीम शेख, मुसा सय्यद,मोहम्मद अली सय्यद,मोहम्मद गौरी, सार्थक साळुंके, ्रसूल सय्यद, अनिस शेख,नजीरभाई शेख, बुर्हाण भाई शेख,अमीर बेग मिर्झा, अकबरभाई शेख, रमेश शिरसाट, सलीमभाई शेख,सौ.समीना रफिक शेख, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

