राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या उमेदवारांचे सत्कार करून दिल्या शुभेच्छा.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये इंदापूर तालुक्यातील कु. प्रतीक्षा ज्ञानदेव वणवे, चेतन ढावरे, निलेश ओमसे, दीपाली धालपे, अशोक नरुटे, अनिकेत वाघ, शैलेश मोरे, प्राजक्ता श्रीनिवास देवकाते- घुले यांनी यश संपादन करत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली याबद्दल आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

