shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुंभारगाव येथे ना. दत्तात्रय भरणे यांनी लेझीम खेळ खेळून वाजवला ढोल ताशा.

कुंभारगाव येथे ना. दत्तात्रय भरणे यांनी लेझीम खेळ खेळून वाजवला ढोल ताशा.

१० कोटी ७७ लाख रुपयांची विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील मौजे कुंभारगाव येथे शनिवार दि. १२ रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १० कोटी ७७ लाख रुपयांची विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ तसेच करून त्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे , प्रताप पाटील हनुमंत बंडगर सचिन सपकाळ हनुमंत कोकाटे सागर मिसाळ कुंभारगाव चे सरपंच उज्ज्वला परदेशी उपसरपंच स्वाती भोईटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्यवर व कुंभार गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कुंभारगाव येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थिती मध्ये १० कोटी ७७ लाख रुपयांची विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी गावकऱ्यांनी दत्तात्रय भरणे यांचा घोड्यावरती बसून मिरवणूक काढली त्यानंतर राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावातील विद्यार्थ्यांना मध्ये मिसळून लेझीम खेळ खेळेल व ढोल ताशा वाजून सर्व ग्रामस्थांना मंत्रमुग्ध करत  आनंद घेतला याचे कुतुहुल या ठिकाणी पाहण्यास मिळाले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणामध्ये कुंभारगाव जरी छोटे असले तरी या गावातील सर्व लहान-थोर जेष्ठ महिला यांचा या कार्यक्रमाला  मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा सहभाग दिसून आल्याचे नमूद केले. छोट्या गावांमध्ये गट-तट असतातच परंतु गावाच्या विकासासाठी एकत्र यावे आणि गावाचा विकास साधावा अशा शब्दात त्यांनी गावात गट बाजी न करता एकमेकांना माफ करत एकमेकांना मान देऊन राजकारणात यशस्वी होता येते याबाबतही त्यांनी यावेळी आपले मत स्पष्ट केले. तसेच गट-तट विसरून कुंभार गावकऱ्यांनी चांगल्याप्रकारे माझ्या निवडणुकी वेळेस मतदान केले त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. काम करणाऱ्या माणसाला पुढच्या माणसाला मान दिला. महत्त्व दिलं . आयुष्यात लोकांना मान देण्याचा प्रयत्न कराल तेवढा तुम्हाला मान मिळेल. कटकटी गट-तट सोडून द्या. आयुष्यात आनंद द्यायचा आणि घ्यायचा असतो. पुढच्या माणसाला आनंद दिला तर दहापट आपल्याला व आपल्या कुटुंबाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. राजकारणामध्ये आयुष्यामध्ये दम थोर असतो सगळी एकत्र येऊन काम करा . गावातील बारा महिला बचत गट आहेत. त्यातील कोणीही माझ्याकडे काम घेऊन आले तर मी नक्कीच काम करेल. असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे म्हणाले की इंदापूर तालुक्याला नेतृत्व दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने लाभले आहे. विकास काम तर होत असतात परंतु आपणा सर्व जनतेला आपल्यातील वाटणारा आणि आपल्यामध्ये मिसळणारा नेता या ठिकाणी लाभला आहे. इंदापूर तालुक्यातील सर्व जनता एकेकाळी नशीबवान समजते. विकास कामे होतच राहतात परंतु आपला मंत्री आपल्यासोबत येऊन आपल्यातील होऊन राहतात हे भाग्य या ठिकाणी पहावयास मिळाले.
close