पूर्ण । प्रतिनिधी:- पूर्णा शहरातील अनेक नगरमध्ये मागील काही दिवसापासून लपून-छपून चालणाऱ्या मटक्यावर पूर्णा पोलिसांच्या पथकाने दिनांक तीन मार्च रोजी छापा मारला असून यामध्ये एक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की मागील काही दिवसांपासून पूर्ण शहरातील अनेक भागांमध्ये लपून-छपून मटका सुरू होता दिनांक तीन मार्च रोजी पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष मारकड यांना गोपनीय मिळालेल्या माहितीवरून त्यांनी मोंढा भागात आरोपी सुरवसे हा मटका घेत असल्याचे दिसून आले त्याच्या जवळील दहा हजार रुपये रोख साहित्य, मटक्याचे आकडे ,कल्याण नावाच्या मटक्याचा पावत्या असा एकूण दहा हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पूर्णा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष मारकड, पोलीस नाईक वसीम पोलीस शिपाई बंडू राठोड यांनी ही कार्यवाही केली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

