पूर्णा ।प्रतिनिधी ;-
तालुक्यातील मौजे आहेरवाडी शिवारात महावितरण कंपनीच्या वाहीन्यात शाॅर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचा दोन एकर जमीनीवरील उभा ऊस जळून खाक झाल्याची घटना शनिवार दि.५ रोजी रात्री घडली.यात शेतकऱ्याचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी शिवारात गट नं.१९९ मध्ये उद्धव लक्ष्मण खंदारे यांचे सुमारे सात एकर बागायती शेत जमीन आहे.गतवर्षी आॅक्टोंबर महीन्यात त्यांनी त्यांच्या चार एकर शेतात ऊसाची लागवड केली होती.याची नोंद वसमत येथिल पूर्णा सह.साखर कारखान्याकडे केली होती.
उद्धव खंदांरे यांच्या शेतातुन महावितरणच्या विद्युत वाहीन्या गेलेल्या असून त्या लोंबकळत असल्याने तारांमध्ये वारंवार शार्ट सर्किट होत असल्याबाबत महावितरण कार्यालयात वारंवार तोंडी कळवले होते.महावितरणने दखल न घेतल्याने शेवटी शनिवारी दि.६ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लोंबकळत असलेल्या विद्युत तारां मध्ये मोठ्या प्रमाणात घर्षण होऊन लागलेल्या आग लागून उभ्या उसाने पेट घेतला ही माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी उद्धव खंदारे यांना दिली.
रात्रीच्या समयी हवा असल्याने पहाता पहाता दोन एकर उसाची राख झाली.परिसरातील शेत-यांनी मोठे शर्थिचे प्रयत्न करत उर्वरीत दोन एकर उस नुकसान होण्यापासून वाचवण्यात यश आले आहे. आगीच्या घटनेत दोन एकर ऊस जळून शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.संबंधीत शेतकऱ्यांने याबाबत भरपाई मिळावी अशी मागणी पूर्णा महावितरण कंपनीकडे केली आहे

