पुर्णा । प्रतिनिधी :-
पूर्णा शहरातील पांगरा रोड वर असलेल्या शाळकरी मुलीला मोबाईल अश्लील मेसेज पाठवणारा आरोपी नंदकुमार लोंढे याच्याविरुद्ध पूर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मोबाइल जप्त करून त्याला गजाआड केले आहे.
दरम्यान आज दिनांक तीन मार्च रोजी पूर्णा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पूर्ण पोलिस करत आहेत.

